वंचित मुलांच्या 'माय' चा अादिशक्तीकडुन गौरव

शिरूर , ता. ७ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : वंचित घटकांतील विशेष मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणण्यासाठी धडपडणा-या सौ.राणी नितीन चोरे यांचा अादीशक्ती महिला मंडळाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात अाला.

अाकांक्षा एज्युकेशन या  संस्थेच्या माध्यमातुन  शिरुर शहरात समाजातील मतिमंद, बहुविकलांग, त्याचबरोबर सेरेब्रल पाल्सी, अॉटिझम, डाउनसिंड्रोम अशा दुर्धर अपंगत्वाने पिडित असलेल्या मुलांसाठी सौ.राणी नितीन चोरे या विशेष काम करत अाहे. समाजातील अशा शिक्षणापासुन वंचित राहणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणुन जगण्यासाठी नवी दिशा देणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील अशा विशेष मुलांकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने हि मुले शिक्षणाच्या प्रवाहापासुन दुर फेकली जातात.त्यामुळे अशा पालकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी देखिल त्यांच्या संस्थेकडुन विशेष प्रयत्न केले जात अाहेत.

यांच्या याच कार्याची दखल घेत शिरुर च्या अादिशक्ती महिला मंडळाने राणीताई चोरे यांचा शाल,श्रीफळ,व सन्मानचिन्ह देउन यथोचित गौरव केला.

याचबरोबर विविध क्षेञात कार्य करणा-या सुमारे ९ महिलांचा नवरोञोत्सवानिमित्त सत्कार करण्यात अाला.

वैद्यकिय क्षेञ असुनही...
अादिशक्ती महिला मंडळाने सन्मान केलेल्यांपैकी डॉ.मनिषा चोरे यांचा देखिल समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा अाहे.लोकांना आनंदी जीवनाची व्याख्या सांगणारा हा क्लास खरोखर खुप फायद्याचा असून लोकांना त्याचा खुप चांगल्या प्रकारे फायदा होत आहे सर्व प्रकारच्या तळागाळातील लोकांपासून विद्यार्थी ,गृहिणी, शेतकरी ,युवक या सर्वाच्या फायद्याचा हा क्लास ठरत आहे खरोखर आनंदी जीवन याची प्रचिती या क्लासद्वारे येते

या क्लास च्या टीचर डॉ मनीषा चोरे या कसलाही मोबदला न घेता समाजाची अखंड सेवा करण्यात मग्न आहेत समाजातील लोकामधे असणारे चिंता,वेळेचे नियोजन,चीड़ चीड़ ,कामाची विभागनी,जबाबदारी,क्लीन इंडिया,योगा,प्राणायाम,समाधी अभ्यास (मेडिटेशन),रॉ फ़ूड कन्सेप्ट,फन क्लब या विषया द्वारे निराकारण होते व एक वेगळा अनुभव लोकांना मिळतो

अशा प्रकारच्या सामाजहिताच्या कार्यास हातभार लावणारे लोक सामाजा मधे खुप कमी असतात त्या पैकी डॉ.मनीषा चोरे या आहेत आपले हॉस्पिटल संभाळत असताना अनेक विधायक सामाजिककार्य या एस एस वाय च्या माध्यमातून करताना दिसतात
या कार्यात अनेक डॉक्टर्स गृहिणी शेतकरी विद्यार्थी युवकवर्ग त्याच्या सोबत जोमाने कार्य करत आहेत


शिरुर शहरात सिद्ध समाधी योग च्या माध्यमातुन अानंदी जीवन जगण्यासाठी प्रेरित केले जाते.या माध्यमातुन अनेकांना स्थैर्य व मानसिक ताण तणाव दुर होण्यास मदत मिळाली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या