सणसवाडीत पाण्यात बुडुन दोघांचा दुर्दैवी मृत्यु

सणसवाडी , ता. ९ अॉक्टोबर  २०१६ (ज्ञानेश्वर मिडगुले/ शेरखान शेख) : येथील सराटी वस्ती येथे असलेल्या एका तलावात आज दुपारच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसमवेत गेलेल्या दोन बालकांचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून दुर्दैवी  मृत्यू झाल्याची घटना घडली. नऊ वर्षाच्या बालाकाच्या मृत्यु ने सणसवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर माहिती अशी कि, सणसवाडी येथील सराटी वस्ती येथे असलेल्या जगताप तळ्यावर दररोज महिला धुणे धुण्यासाठी जात असतात. आज दुपारच्या सुमारास काही महिला धुणे धुण्यासाठी गेलेल्या होत्या तेव्हा आई समवेत काही मुले देखील त्या तलावावर गेलेली होती. यावेळी अनेक महिला धुणे धूत असताना काही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरले.

 या वर्षी या तलावाचे खोलीकरण झालेले असल्याने तलाव देखील खोल झालेला असल्यामुळे पाणी देखील खोल आहे. परंतु पाणी खोल असल्यामुळे पाण्याचा अंदाज या मुलांना आला नाही व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कृष्णा उघडे व संतोष मोरे हि दोघे मुले पाण्यात बुडाली.हि मुले पाण्यात बुडत असताना तेथील महिलांनी आरडाओरडा केला. यावेळी तेथे असलेले काही युवक पळत आले व त्यांनी पाण्यात उडी मारून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. काही युवक व इसमांनी मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.

पाण्यात बुडत असलेल्या मुलाला एका युवकाने वाचवण्याचा प्रयत्न देखिल केला.परंतु प्रयत्न असफल ठरला. यावेळी अनेक युवक त्या मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना युवकांनी पाण्यात बुडालेल्या सुमित गजानन मोरे (वय–९वर्षे) तसेच सिद्धेश्वर संतोष उघडे (वय–१२) वर्षे दोघेहि रा. डफळ बिल्डींग, प्रगतीनगर, सणसवाडी या दोघांना पाण्यातून बाहेर काढले.या दोघांना सणसवाडी येथील भक्ती हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे यांना वाघोली येथील आयमाक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, उपनिरीक्षक चेतन थोरबोले, हेमंत शिंदे, कृष्णा कानगुडे, तेजस रासकर, ब्रम्हा पोवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सदर मुलांना वाघोली येथील रुग्णालयात नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या