शिरुर तालुक्यात दसरा उत्साहात साजरा

मांडवगण फराटा , ता.४ अॉक्टोबर २०१६ (राजेंद्र बहिरट)  : येथे भ्रष्टाचार, महागार्इ, दहशतवाद व रोगरार्इरूपी  45 फुटी रावणाचे उत्साहात दहन करण्यात आले.त्याचप्रमाणे शिेरुर शहरासह तालुक्यात दस-यानिमित्त विविध कार्यक्रमाचे अायोजन करण्यात अाले होते.

विजयादशमीनिमीत्त सिमोल्लंघन करत गावचे मुलकी पाटील हेमंत पाटील फराटे यांच्या हस्ते रावणदहन करण्यात आले. जय हनूमान तरूण मंडळाचे रावण दहन अायोजनाचे  हे 16 वे वर्ष आहे. ग्रामदैवत श्री वाघेश्वर मंदीरापासून बॅंड पथकासह ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत  ग्रामस्थांनी सासन काटया नाचवत मिरवणूक काढलेली होती.

भिमा नदीकाठी असणा-या खंडोबाच्या मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती घेण्यात आली. तसेच मंदिरामध्ये दसरयानिमीत्त सोने लुटण्यासाठी ठेवलेल्या आपटयाच्या पानांची पूजा करण्यात आली.तसेच हा रावण जय हनूमान तरूण मंडळातील चिमुकल्यांनी बनविला होता.शिरुर शहरात देखील अनेक  कार्यक्रमांचे अायोजन करण्यात अाले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठिकठिकाणी संचलन केले.नागरिकांनी देखिल दस-याचे अौचित्य साधुन मोठया प्रमाणावर वाहन खरेदी,सोने खरेदी केली.तालुक्यातील अनेक गावांत देखिल दिवसभर  उत्साहाचे वातावरण दिसुन होते.अनेक ठिकाणी एकमेकांना अापटयाची पाने (सोने)एकमेकांना देउन नागरिकांनी दसरा उत्साहात साजरा केला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या