सादलगावात गायरानावर तरुणांचे सर्जिकल स्ट्राईक ?

सादलगाव, ता.१२ अॉक्टोबर २०१६ (संपत कारकुड) : येथील गायरान जमीनीवर स्थानिक व बाहेरगावाहुन आलेल्या नागरिकांनी मोठया प्रमाणात जागा बळकविल्यामुळे येथील अडचन निर्माण झाली असताना येथील तरुण सदस्य व नागरिकांनी कोणतीही माहिती न देता बळकविलेली अंदाजे 10 एकर जागा दोन दिवसांत मोकळी केली.

भारत-पाकिस्तान सिमेप्रमाणे बळकविलेल्या जागेवर वाट्टेल तसा मालकी हक्क सांगून त्यामधुन जाण्यास मज्जाव करणारे तसेच त्यावर पक्के बांधकाम, जनावरांचा गोठा,शौचालयाचे दिखाऊ खडडे, शेणाचे उकिरडे आणि इतर राडारोटा टाकुन नदीकाठापर्यंत जागा बळकविण्याचा प्रकार गावातील जागृत नागरिकांनी उधळून लावला. जागा किती हडप करावयाची याचे भान राहिले नसल्याने तसेच बळकविलेल्या जागांमुळे नदीला जावे कसे हा सर्वात मोठा प्रष्न पडल्यामुळे हे अतिक्रमण त्वरित काढण्याचा निर्णय येथील तंटामुक्तीचे सदस्य भाऊसाहेब गायकवाड, उपसरपंच अविनाश पवार, सदस्य देवीदास होळकर, अशोक लवांडे, माणिक अडसूळ, पांडुरंग होळकर, अशोक मिठे यांनी घेतला. हे अतिक्रमण काढण्यासाठी पुढे कोणीच येईना. सर्व कायदेशिर माहिती व चर्चा करुन दोन दिवसांमध्ये हे काम वरील ग्रामस्थांनी पुर्ण केले असून अजुनही बळकविलेले गायरान मोकळे करण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे.

भटाला दिली अोसरी...

भटाला दिली अोसरी अन् भट हळुहळु पाय पसरी या म्हणीचा पुरेपुर वापर सरकारी गायरान जागेवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांकडुन ग्रामपंचायतीला आला. मताच्या राजकारणातुन केवळ माणसे जपण्यासाठी गेली चाळीस वर्षांपासुन पोचलेला अतिक्रमणाचा ब्रम्हराक्षस जेव्हा जनतेच्याच मानगुटीवर बसला तेव्हा मात्र सर्वांचाच नाईलाज झाला. आता यावर निर्णायक कारवाई करुन बळकविलेल्या जागा ताब्यात घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

कोणताही पोलिस फौज फाटा न वापरता गावातील तरुण सदस्यांनी आणि धाडशी तरुणांनी हे काम केलेले असल्यामुळे त्यांचे गावात नारा्जी वजा कौतुक होत असून मोकळी जागा ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली आहे. यावर इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी ही उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खुशीचे वातावरण आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या