पाठिंब्याबद्दल मनापासुन अाभार- पं.स.सदस्या दिपाली शेळके

शिक्रापूर , ता. १४ अॉक्टोबर  २०१६ (प्रतिनीधी): सकाळ तनिष्का स्ञी प्रतिष्ठाण अभियान अंतर्गत सुरु असलेल्या निवडणुकित शिक्रापुर विभागातुन दिपाली बाळासाहेब शेळके यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात नसल्याने शिक्रापूर विभागातील निवडणुक रद्द केली असल्याची  माहिती शेळके यांनी दिली.तसेच सर्वसामान्य जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल  ऋणी असल्याचे  त्यांनी सांगितले.
विद्यमान पंचायत समिती सदस्या दिपाली शेळके या शिक्रापुर विभागातुन तनिष्का प्रतिष्ठाण च्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत निवडणुक लढवत होत्या.परंतु समोरील उमेदवाराने माघार घेतल्याने व काहि अपरिहार्य कारणाने निवडणुक रद्द करण्यात अाल्याची माहिती त्यांनी दिली.


कार्याचा अल्प परिचय :
 जनसामान्यांशी गेली अनेक दशके सामाजिक कार्याच्या माध्यमातुन नाळ जोडली अाहे.ग्रामपंचायत ते पंचायत समिती सदस्य, शिरुर नगरपरिषद ते गावच्या प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील गोरगरीब जनतेशी अत्यंत जवळुन त्यांचा परिचय अाहे.

त्याचबरोबर शिरुर तालुक्यातील महिलांच्या प्रत्येक प्रश्नासाठी त्यांनी विविध प्रकारे अाजतागायत लढा दिला अाहे.थोडक्यात त्यांचे कार्य सांगायचेच झाल्यास अापल्याला शब्द देखिल अपुरे पडतील.शिरुर तालुक्यात अाभासी वर्गाद्वारे त्यांनी सुमारे ६० गावातील ४० वाड्यावस्त्यांवरील ६७६  महिलांना कुशल प्रशिक्षण देउन सक्षम केले.अौद्योगिक क्षेञात महिलांना स्थान देउन नोकरीसाठी मोठी संधी निर्माण केली अाहे.

शिरुर तालुक्यात सुमारे५५० बचतगटांद्वारे ८२५० महिलांना स्वत:चे स्थान निर्माण करुन ऐतिहासिक बचत गट चळवळ रुजु करण्यात दिपालीताईंचा खारीचा वाटा अाहे.

त्याचबरोबर सामाजिक क्षेञात देखिल भरीव कामगिरी असुन वेळोवेळी अनाथ मुलांना मदत, अारोग्य शिबिरे, व्यक्तिमत्व विकास शिबिरे,दारुबंदी व व्यसनमुक्तीसाठी प्रत्येक गावात कार्यशाळा वेळोवेळी अायोजित केल्या असुन अनेक कुटुंबाना व्यसनापासुन परावृत्त केले अाहे.स्ञी जन्माचे स्वागत, स्ञी पुरुष समानता, समस्याग्रस्तांचे पुनर्वसन अादी सामाजिक उपक्रम राबवुन कित्येकांना स्थैर्य मिळवुन दिले अाहे.

शिरुर तालुक्याचे नांव सुगंधी उटण्याच्या मार्फत देशपातळीवर नेण्यात दिपाली शेळके यांची महत्वाची भुमिका  असुन तत्कालीन राष्ट्रपती अादरणीय प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या विशेष कार्याची दखल तर घेतलीच परंतु यथोचित गौरव देखिल केला अाहे.

शिरुर शहरात शासकिय मुलींच्या वसतीगृहात शहरासह जिल्ह्याला हादरवुन सोडविणा-या बलात्काराच्या घटनेनंतर झोपी गेलेल्या शासकिय यंञणेला खडबडुन जागे करुन निवासी अधिक्षिका भरण्यासाठी तत्कालिन पोलीस निरीक्षकांना देखिल खडे बोल सुनावले होते.सुमारे १३ दिवस चाललेल्या या अांदोलनानंतर अखेर शासकिय यंञणेला देखिल दखल घेणे भाग पडले अन अखेर महिला अधिक्षिका  हे पद भरण्यात अाले व त्या कोवळ्या बालकांना न्याय मिळवुन दिला.

यशस्विनी च्या माध्यमातुन राज्यस्तरावर बचत गटाच्या वस्तुंना स्वतंञ बाजारपेठ उपलब्ध करुन महिलांना बाजारपेठेत हक्काचे स्थान मिळवुन दिले व अार्थिकदृष्ट्या सक्षम बनविले अाहे.त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलीस मैञिण नावाची अनोखी संकल्पना राबवुन अल्पावधीत थेट  पोलीस मदत मिळु  लागल्याने परिसरातील  महिलांना सन्मानाने जगण्याची संधी मिळु लागली. अत्याचार,छेडछाड, अादी प्रकार थांबवुन माता भगिनींना एकप्रकारे दिलासा मिळवुन दिला.

पाणी वाचवा अादी उपक्रम राबवुन दुष्काळातील पाणी टंचाई साठी व्यापक चळवळ देखिल राबविली.शिरुर, रांजणगाव गणपती व शिक्रापुर पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना तान तणाव मुक्तीसाठी वेळोवेळी उपक्रम अायोजित करुन जीवनात अानंदाचे क्षण अाणले.त्याचबरोबर नागरिक व पोलीस यांत सलोख्याचे वातावरण निर्मान करण्यासाठी विशेष प्रयत्न केले अाहेत.

शिरुर तालुक्यातील महिलांसाठी भोर, बारामती, बेंगलोर, गुजरात तसेच दिल्ली व विविध मंञालये अादींचे वेळोवेळी अभ्यासदौरे अायोजित केले अाहेत.

या सर्व तालुकास्तरीय,राज्यस्तरीय, व देशपातळीवर केलेल्या कार्याची दखल घेत अनेकांनी पुरस्कार व सन्मान करुन गौरविले अाहे. त्यामध्ये प्रामुख्याने मा.उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी २०११, शिरुर तालुक्याचे प्रथम संकेतस्थळ शिरुर तालुका डॉट कॉम ने २०१३, मा.शरदचंद्र पवार साहेब,माजी गृहमंञी अार अार पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते २०१३ साली, श्री क्षेञ रांजणगाव गनपती देवस्थान ने २०१३-१४, व पोलीस मिञ साप्ताहिक च्या वतीने या वर्षी पुरस्कार अादर्श कार्याचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देउन गौरव केला अाहे.

या सर्व काळात सर्व तालुक्यातील ज्येष्ठ व सर्वसामान्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.त्याचमुळे सामाजिक क्षेञात गरुडभरारी घेता अाली.या पुढील काळात देखिल सर्वसामान्यांसाठी लढा सुरुच ठेवणार असल्याचे शिक्रापुर विभागाच्या उमेदवार दिपाली शेळके यांनी बोलताना सांगितले.

या पुढेही अापल्या सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन, अाणि मार्गदर्शन कायम लाभो अशी ईच्छा  या वेळी बोलताना त्यांनी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या