शिरूर पत्रकार संघाची ऑनलाईन निवडणूक

शिरूर , ता. १४ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : देशातील पञकार संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच अॉनलाईन निवडनुकिचा प्रयोग राबविण्याचा मान शिरुर पञकार संघाला मिळणार अाहे.त्यामुळे या निवडणुकिकडे सर्वांचेलक्ष लागुन राहिले अाहे.

शिरूर तालुका पत्रकार संघाची निवडणूक येत्या 16 तारखेला होत आहे.हि निवडणूक ऑनलाईन पध्दतीनं सर्वप्रथम शिरुर तालुक्यात केली जात आहे.म्हणजेच आपण घरी बसून,मोबाईलवरून आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करू शकणार आहात. एखादया पत्रकार संघाच्या निवडणुकीत ऑनलाईन पध्दतीनं मतदान घेण्याचा देशातला पहिला प्रयोग म्हणून शिरूरच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.त्यामुळे शिरूरमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे. निवडणुकीत कशा पध्दतीनं मतदान केलं पाहिजे याच्या काही टीप्स दिलेल्या आहेत.त्यानुसार आपल्या नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरून हे मतदान करता येईल.तत्पुर्वी सर्व सदस्यांना प्रक्रिया माहिती व्हावी म्हणून 15 तारखेला चाचणी मतदान घेतले जाणार आहे.

याची परिषदेच्या इतिहासात नोंद होणार आहे.दरम्यान शिरूर तालुका पत्रकार संघाला राज्यातील पहिली ऑनलाईन निवडणूक घेण्याचा बहुमान मिळाला आहे त्याबद्दल शिरूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचे परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी अभिनंदन केले असून निवडणूक प्रक्रिया यशस्वी राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या