साईक्रांती प्रतिष्ठानचा नेहरु युवा केंद्राकडुन गौरव

वडनेर खु. , ता. १६ अॉक्टोबर  २०१६ (तेजस फडके) : येथील साईक्रांती प्रतिष्ठान ला नेहरु युवा केंद्र युवक व खेल-क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने नुकताच स्वच्छता,क्रीडा,सांस्कृतिक,युवक कल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल उत्कृष्ठ संस्था म्हणून गौरव करण्यात आला.

नेहरु युवा केंद्राचे महासंचालक व युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकारचे संचालक लेफ्टनंट जनरल दिलावर सिंग, पुणे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आला. आठ हजार रुपयांचा धनादेश व सन्मान चिन्हे असे पुरस्काराचे स्वरुप होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माने उद्योग समुहाचे अध्यक्ष रामदास माने, उद्योजक कॅप्टन निलेश गायकवाड, संयुक्त राष्ट्रसंघाचे आशिया खंडाचे युवा राजदूत प्रवीण निकम,श्रमिक प्रत्रकार संघाचे अध्यक्ष गजेन्द्र बड़े, पुणे विद्यापीठ एन.एस,विभागचे प्रमुख डॉ. संजीवकुमार दळवी,मदन घेगाटे उपस्थित होते. यावेळी सर्वानी प्रतिष्ठाने केलेल्या कामाचे कौतुक केले. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग उभे करुन भारत सरकारच्या स्टार्ट अप योजनेचा फायदा घेवा असे लेफ्टनंट जनरल दिलावर सिंग, उद्योजक रामदास माने यानी सांगितले.

यावेळी पुरस्कार स्वीकारताना अध्यक्ष विक्रम निचित, संस्थापक नवनाथ निचित,सचिव बाबाजी निचित,जालिंदर निचित,मारुती निचित.विकास कापसे, संपत बोर्हड़े,रावसाहेब निचित,विनायक निचित,निलेश निचित,रामदास पवार,गोविंद गोरडे,सागर धुमाळ हे कार्यकर्ते उपस्थित होते.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या