खरं सांगु...माझ्या बापातचं मला देव दिसतो !

मांडवगण फराटा , ता. १६ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : नी दाबुनी वेदना जितापणीचं तो मरतो, सा-या जगाचा पोशिंदा तो कामे बैलाची करितो, संकटं येता  माझ्या वरती स्वत: वरती तो घेत असतो.खरं सांगु...माझ्या बापातचं मला देव दिसतो अशा बहारदार कवितांनी मांंडवगणकर शब्दांच्या मैफिलीत अक्षरश: न्हाउन गेले होते.

मांडवगण फराटा येथे ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच कविसंम्मेलन अायोजित केले होते.या कविसंम्मेलनाला जिल्हाभरातुन प्रामुख्याने अाबेद शेख(यवतमाळ), हनुमंत चांदगुडे(सुपा),सोमनाथ सुतार(बारामती), अरुण पवार(बीड), विलास हाडवळे(जुन्नर),भानुदास फराटे, मनोहर परदेशी (मांडवगण फराटा), रा.वि.शिशुपाल (पारगाव), चंद्रकांत चाबुकस्वार(कानगाव),डॉ.पांडुरंग बानखेले वडगाव रासाई, संतोष शेलार (तांदळी) अादींना निमंञित करण्यात अाले होते.

या वेळी झालेल्या मातीच्या, मातेच्या व सद्यस्थितीवर भाष्य करणा-या कवितांनी रसिक मंञमुग्ध होऊन गेले.काहि कविता या ह्रदयाला अक्षरश: स्पर्शुन गेल्या. मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितांचे शेवटी अाभार मानन्यात अाले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या