नव्या चेह-यांना खरंचं संधी मिळणार ?

करडे, ता. १८ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : न्हावरा पंचायत समिती गणाच्या निवडणुकित कोणत्या नव्या चेह-यांना संधी मिळणार ?? याची मोठी उत्सुकता सर्वसामान्यांना लागुन लागली अाहे.

न्हावरा या नावाने नव्याने तयार झालेला गण हा ओबीसी महिला यासाठी आरक्षित झाला असुन, या गणामध्ये प्रामुख्याने करडे, अांबळे, कळवंतवाडी, न्हावरे, कोहोकडीवाडी, शिंदोडी, गुणाट, चिंचणी, हि गावे समाविष्ट होतात.

या गणाची नव्याने रचना झालेली असुन न्हावरे सह वरील इतर गावे जोडली गेलेली अाहेत. या गणामध्ये खरोखरंच ओबीसी महिलेला संधी मिळणार की कुणबी दाखला काढलेल्या उमेदवाराला या गणातुन उमेदवारी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सद्यस्थितीत उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट झालेले नसले तरी सर्वसामान्यांच्या चर्चेतुन दोन उमेदवारांची तयारी चालु असल्याचे समजते, न्हावरे गावातुन अॅड.वैशाली सचिन बहिरट या इच्छुक असल्याचे समजते.तर करडे गावातुन सौ. वृषाली विशाल घायतडक या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा ऐकायला मिळत अाहे.

शिरुर पंचायत समिती गणात खुला प्रवर्गासाठी आरक्षण आल्याने तिथे उमेदवारीसाठी खुप चुरस होईल अशी शक्यता आहे.

न्हावरे गणामध्ये करडे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. विशाल घायतडक यांच्या पत्नी वृषाली या प्रबळ उमेदवार असल्याचे चिञ सद्यस्थितीत तरी दिसत असुन, तशी त्या गणांतील गावांमध्ये चर्चा ऐकायला मिळत अाहे.

करडे ग्रामपंचायत मध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले श्री. विशालभाऊ घायतडक यांना मुळचा राजकिय वारसा लाभला असुन त्यांच्या मातोश्री सौ. रुक्मिणी निळकंठ घायतडक या करडे गावच्या प्रथम महिला सरपंच होत्या.विशालभाऊ घायतडक यांनी अाजतागायत विविध माध्यमांतुन सुमारे त्यांच्या वॉर्डात अनेक विकासकामे केली अाहेत, गावात अंतर्गत रस्ते, दलितवस्ती सुधार योजना,पाणी अडवा पाणी जिरवा च्या अंतर्गत बंधारे, प्राथमिक आरोग्य केंद्र, वॉलकंपाउंड अादी दर्जेदार कामे करुन चांगल्या कामाची या विकासकामांच्या माध्यमातुन चुणुक दाखवली अाहे.

घरातुनच समर्थ राजकिय वारसा व गावातील जाणत्या व जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली संधी मिळाल्यास त्या चांगली विकासकामे करु शकतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

त्यामुळे सद्यस्थितीत वृषाली घायतडक पंचायत समिती गण न्हावरा या गणातुन उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार अाहेत.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या