निवडणूकीच्या तोंडावर सर्वेक्षणाचा फार्स ?

तळेगाव ढमढेरे,  ता.२६ अॉक्टोबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव दाभाडे – शिक्रापूर – चौफुला या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी रस्त्याचे मोजमाप तसेच वाहतुक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याचे लोकप्रतिनिधीही सांगत आहेत.मात्र नेहमीप्रमाणे निवडणूकीच्या तोंडावर हा फार्स असल्याची चर्चा परीसरातील नागरीकांमध्ये आहे.

तळेगाव दाभाडे –चाकण–शिक्रापूर– तळेगाव ढमढेरे–न्हावरे–चौफुला या बहुचर्चित रस्त्याच्या  चौपदरीकरणासाठी खासगी कंपणीच्या वतीने रस्त्याचे मोजमाप तसेच रस्ता रूंदीकरणासाठी व्यापलेल्या जागेचे मोजमाप व मीटर आणि किलोमिटरच्या खुणा केल्या जात आहेत.

या प्रस्तावित चौपदरी रस्त्यावर ठिकठिकाणी टोल नाके उभारून टोल वसूल करण्यात येणार असल्याने वाहतुकीचा अंदाज येण्यासाठी चौफुला ते न्हावरे दरम्यान घोडगंगा कारखाण्याजवळ, न्हावरे ते शिक्रापूर दरम्यान उरळगाव फाटा येथे, शिक्रापूर ते चाकण दरम्यान शिक्रापूर येथील जुण्या टोल नाक्या जवळ तर चाकण ते तळेगाव दाभाडे दरम्यान भोपाळ येथील लायन इंजिनिअरींग कन्सल्टंट कंपनीच्या वतीने वाहतुक सर्वेक्षण करण्यात येत आहे.

या सर्वेक्षणात रस्त्यावरून जाणा-या व येणा-या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी मोटार गाडया, ट्रॅक्टर, ट्रक, अवजड मालवाहू वाहने तसेच अन्य मोटारगाडया यांची गणती करून ती नोंदविण्यात येत आहे.सलग आठ दिवस हे सर्वेक्षण करून व त्याची सरासरी काढून पुर्ण झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनीक बांधकाम विभागाला देण्यात येणार असून त्यानंतर हा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सर्वेक्षण करणा-या सर्वेक्षकांनी सांगीतले.

तर अशा प्रकारचे सर्वेक्षण व रस्त्याचे मोजमाप, रस्त्यासाठी व्यापलेल्या जागेवर नंबरचे ब्लॉक्स लावणे, व्याप्त जागेवरील झाडांवर तसेच घरांवर फुल्या मारणे, रस्त्याची लांबी मोजण्यासाठी मिटर व किलोमीटरच्या खुणा करणे असे प्रकार ब-याच वेळा झाले आहेत.

विशेषत: निवडणूकांच्या तोंडावर सत्तेतील पक्षाकडून असा दिखावा केला जात असल्याच्या भावना परीसरातील नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत.सध्या नगरपालीका, जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणूका लागल्याने रत्याचे चौपदरीकरण होणार हा मतांच्या राजकारणासाठी केलेला फार्स असल्याची परीसरात जोरदार चर्चा आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या