चोरीच्या मोटारसायकल पोलीसांकडुन हस्तगत

रांजणगाव गणपती , ता. २७अॉक्टोबर  २०१६ (प्रतिनीधी) : रांजणगाव पोलीसांकडुन सुरु असलेल्या नाकाबंदीच्या दरम्यान दोन  वाहने हस्तगत  करण्यात अाली असुन चोरीची असल्याचे निष्पन्न झाले अाहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील याझाकी कंपनीसमोर लावलेली मोटारसायकल व मोटारसायकल च्या टुल बॉक्स मधील मोबाइल चोरीला गेला असल्याची फिर्याद धनंजय बाळु खेडकर,रा.देवाचीवाडी यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन ला दाखल केली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या नाकाबंदी च्या दरम्यान  दोन इसम कागदपञ नसलेल्या गाडीसोबत पोलीसांना मिळुन अाले.त्यांच्या कडे कसुन तपासणी केली असता सदरच्या दोन्ही मोटारसायकल चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीसांनी सांगितले.तसेच त्यांच्याकडे चोरीचा मोबाइल देखिल मिळुन अाला.

या प्रकरणी मयुर सुरेश काळे, रा.पिंपरी जलसेन या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले व रविंद्र  कैलास  खाकरे वय २२ रा.गोरेगाव, ता.जामनेर,जि.जळगाव व सध्या रा.कारेगाव यास अटक केली अाहे.

या तपासामध्ये पोलीस कर्मचारी मंगेश थिगळे, प्रकाश माने, राजु मोमीन, अजय भुजबळ, मिलिंद देवरे अादींनी कसुन तपास करत सहभाग घेतला.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या