किल्ले बांधण्यासाठी चिमुकल्यांत चढाओढ

तळेगाव ढमढेरे,  ता.२८ अॉक्टोबर २०१६ (जालिंदर अादक) : दिवाळीची सुट्टी म्हणजे बालगोपाळांची नुसतीच धम्माल.याच सुट्टीच्या काळात किल्ले बांधण्यासाठी चिमुकल्यांची चढाओढ लागली असल्याचे चिञ ठिकठिकाणी पहावयास मिळत अाहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी  त्यांच्या काळातील बांधलेले किल्ले अजूनही राज्यात पहावयास मिळतात आणि दीपावलीची सध्या शाळेला सुट्टी लागल्याने लहान मुले किल्ले बणवण्यात व्यस्त असल्याचे चिञ पहावयास मिळाले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व त्यांच्या विचारांचा विसर पडला असल्यामुळे तरुण मुलांना आपली परंपरा, संस्कृतीचा विसर पडला  आहे अशी जुनी माणसे बोलून जातात. पण सध्या या बालचुमुंनी छत्रपतीच्या विचाराची, संस्कृती व कार्याची आठवण करून किल्ले बनवून त्यामध्ये सैनिकांचा फौजफाटा प्राणी किल्ल्याच्या कडेने संरक्षण भिंत महाराजांना बसण्यासाठी सिहासन, पुढे मैदान त्यामध्ये हिरवळ अश्या अनेक पद्दतीने किल्ल्याचे काम आटोपले आहे दीपावलीच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला जाऊन किल्ले बनवायचे अशी इच्छा काही मुलांची असती तर काही आपल्या घरीच किल्ला बनवून दिवसभर अन्न पाणी न घेता तिथेच काहीतरी खेळ खेळत बसताना आपण पाहत आहोत.

इतिहासाबाबत मुलांना शाळेत शिकवले जाते मात्र किल्ले कसे बनवण्याचे शिक्षण नसताना हि उत्कृष्ठ पद्धतीत हि चिमुकली मुले हुबेहुब किल्ला बनवतात. काहींना बाजारात रेडिमेड बनवलेला किल्ला मिळतो. त्यांना त्याची कला सादर करता येत नाही. किल्ला बनवण्यासाठी दगड, माती, विट, पाणी, साखर बारदाना, लाकुड, असे साहित्य मिळविण्यासाठी हि चिमुकली मुले दुपारच्या उन्हात फिरत असतात. सद्याच्या युगात मुलांना मैदानी खेळाकडे दुलक्ष करून संगणकाच्या जमान्यात मुले मोबाइलमधील व  संगणकात गुंतून पडली आहे.

त्यांना घराबाहेरचे खेळ लागत नसल्याचे पहावयास मिळत आहे किल्ले बनवून
त्या किल्ल्याभोवती तासनतास मुले खेळतात. त्यांना दिवाळीला लागलेली सुट्टी कधी संपते हेच कळत नाही.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या