पत्रकारिता हि लोकाभिमुख असावी- अशोक पवार

सणसवाडी , ता. २९ अॉक्टोबर  २०१६ (ज्ञानेश्वर मिडगुले) : टिळक, आगरकर यांनी जसा समाजासाठी आपल्या लेखणीतून ठसा निर्माण केला त्याच प्रमाणे पत्रकारांनी देखील शेतकरी ,व्यवसायिक व सामाजिक विषयात लेखन करून क्रांती घडवावी व सदैव सेवाभावी वृत्ती ठेवावी असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केले.

सणसवाडी (ता .शिरूर ) येथील अखिल नवरात्रौत्सव मंडळ व दत्ताभाऊ युवा मंच यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या शिरूर तालुका मराठी पत्रकार संघात नवीन  कार्यकारणीत निवडून आलेल्या पधाधिका-यांचा सत्कार व दिवाळी निमित्त नागरिकांना साखर व फरसाण वितरण कार्येक्रमात पवार बोलत होते.पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित पत्रकार संघाच्या कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला यामध्ये अध्यक्ष सुनील भांडवलकर ,उपाध्यक्ष विठ्ठल वळसे पाटील, संभाजी गोरडे, पोपट पाचंगे, राजाराम गायकवाड , योगेश  मारणे , ज्ञानेश्वर मिडगुले, महाराष्ट राज्य पत्रकार संघाचे सचिव शरद पाबळे ,रामदास लोखंडे,प्रमोद कुतवळ इत्यादींचा सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना, शिवसेनेने राज्यातील लोकांना मराठा मोर्चा बाबत दैनिक सामनातून जो लोकांचा रोष ओढवून घेतला तो रोष जनतेसमोर मांडण्याची महत्वाची भूमिका पत्रकारांनीच बजावली असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.तसेच माजी आमदार अशोक पवार यांचा हस्ते दीपावली निमित्त नागरिकांना साखर फरसाण तसेच मिठ्ठाई बॉक्स वाटण्यात आले .
                    
यावेळी घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, राष्ट्रवादी ज़िल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर,सणसवाडी च्या सरपंच वर्षाताई कानडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ हरगुडे, जिजामाता बँकेचे संचालक पंडित दरेकर, माजी सरपंच शिवाजी दरेकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ हरगुडे, राहुल दरेकर, रमेश सातपुते, कामगार नेते दत्ता हरगुडे, सोमनाथ दरेकर, नामदेव दरेकर, गोरख भुजबळ ,रमण दरेकर ,भाऊसाहेब दरेकर किसन हरगुडे  व ग्रामस्थ उपस्थित होते .
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या