‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या‘व्हॉटसअप ई-पेपर’चा शुभारंभ


शिरूर , ता. ३१ अॉक्टोबर  २०१६ (संपत कारकुड) :
गेली साडेपाच वर्षांपासुन वेबसाईटच्या माध्यमांतुन तालुक्यासह जगभरातल्या ताज्या घडामोडीचा वेध घेउन तरुणाईसह सर्वच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘www.shirurtaluka.com’ने ‘व्हॉटसअप ईपेपर’आवृत्तीचा शुभारंभ पुणे येथे माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांच्या हस्ते नुकताच करण्यात अाला.

या प्रसंगी श्रीमंत सरदार हिमांशु रविंद्रराजे पवार, संजीव पलांडे, 'शिरुर तालुका डॉट कॉम’चे संस्थापक संतोष धायबर, पत्रकार तेजस फडके, कार्यकारी संपादक सतीश केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी माजी अामदार सुर्यकांत पलांडे यांनी संकेतस्थळाच्या बातम्यांचे कौतुक केले त्याचबरोबर संकेतस्थळाच्या माध्यमातुन सामाजिक जाणिवेचे भान ठेवत राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल शाबासकिची थाप देखिल मारली.

संपुर्ण पुणे जिल्ह्यासह जगभरात सुमारे ११० देशांत संकेतस्थळ www.shirurtaluka.comचे लाखो वाचक दररोज भेटी देत अाहेत.त्याचबरोबर सुमारे ५०० हुन अधिक व्हॉट्सअप ग्रुप जोडले गेले असल्याने फेसबुक व ट्विटर अशा माध्यमांतुन सुमारे लाखो वाचकांपर्यंत एका  सेकंदात गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडी या शिरुर तालुका डॉट कॉम च्या लाखो वाचकांपर्यंत पोहोचतात.

 त्यामुळेच कि काय या संकेतस्थळाने  सर्वसामान्य  वाचकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले अाहे.गेल्या पाच वर्षांपासुन राजकिय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, तसेच इत्भुंत घडामोडीचा वेध घेत बातम्यांच्या माध्यमातुन  सर्वसामान्यांना न्याय देण्याचा देखिल वेळोवेळी प्रयत्न केला अाहे.या वाढत्या प्रतिसादामुळे  शिरुर तालुका डॉट कॉमच्या माध्यमातुन अाता व्हॉट्सअप ईपेपर रंगीत चार पानी अंक दर अाठवड्याला प्रसिद्ध  होणार अाहे.

दिवसेंदिवस बदलत्या काळाबरोबर वाचकांची पसंती देखिल बदलत असल्या कारणाने व वाचकांच्या अाग्रहास्तव ‘व्हॉटसअप ई पेपर’ तयार करुन तालुक्याच्या सर्व घडामोडी प्रत्यक्ष ई-पेपरवरच उतरवून प्रत्यक्ष पेपरचीच अावृत्ती व्हॉटसअप, फेसबुक व ट्विटर या सोशल मिडिया च्या साधनांद्वारे  आता एकाच ठिकाणी वाचकांची सर्व गरज पुर्ण होणार आहे.

या मध्ये एकूण चार पानांमध्ये विभागलेल्या या अवृत्तीमध्ये तालुक्यातील संवेदनशिल घटना व घडामोडीची प्रमुख बातमी, थेट गावातील छोटया मोठया घडामोडीवर लक्ष ठेवून त्यासंबंधित छोटया-मोठया घडामोडींना विशेष अग्रक्रम देण्यात येणार आहे.

सध्याच्या धावत्या युगात निवांत पेपर वाचनेसुध्दा  शक्य न होणा-या  प्रत्येक वाचकांना अगदी चालता-बोलता सहज वाचता येणारी ‘व्हॉटसअप आवृत्ती’ देवून दिवाळीनिमित्त सर्व वाचकांनाही सप्रेम भेट ठरत आहे.

व्हॉट्सऍप पेपर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ई-अावृत्ती पाहण्यासाठी अामच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
शिरूर तालुक्यासह जगभरातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी Like करा...
http://www.facebook.com/ShirurTalukaDotCom


शिरूर तालुका डॉट कॉमच्या पेजला Like करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
http://www.facebook.com/ShirurTalukaDotCom
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या