कवठे येमाई येथील जळालेल्या शाळेची नव्याने उभारणी

कवठे यमाई , ता.२ नोव्हेंबर  २०१६ (सुभाष शेटे) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलची जुनी इमारत  मागील काही महिन्यापूर्वी अचानक आग लागल्याने आगीच्या भक्षस्थानी पडली होती. त्यानंतर आर्थिक सहयोगातून कवठे येमाई येथे हायस्कुलच्या नवीन अद्ययावत इमारतीच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे .

कवठे येमाई परिसरातील विद्यार्थ्याना माध्यमिक शिक्षणासाठी येथील रयत शिक्षण संस्थेची शाळा अत्यंत उपयुक्त असून १९७७-७८ च्या दरम्यान येथील हायस्कुलच्या जुन्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते.लाकडी कैच्या, कौले व दगड माती व सिमेंटचे बांधकाम असलेली ही  इमारत जुनी झालेली होती.याच  इमारतीत विद्यार्थी ज्ञानग्रहणाचे कार्य करीत होते. या इमारतीत शाळेची विज्ञान प्रयोगशाळा ही होती . मागील काही महिन्यापूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास या इमारतीस आग लागल्याने शाळेचे मोठेच नुकसान झाले.व हि जुनी इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली .

या ठिकाणी नवीन व अद्ययावत इमारत उभी करायचीच हा संकल्प करीत कवठे येमाई ग्रामस्थानी विविध स्तरातून लोकवर्गणी जमा केली . यात शाळेचे माजी विद्यार्थी,ग्रामस्थानी मोठे आर्थिक योगदान दिले.

गावातील सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,स्थानिक तरुण मंडळे,शिक्षणप्रेमी ,शेतकरी  यांनी या कामी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार राम कांडगे,संस्थेचे माजी मॅनेजींग कौन्सिल सदस्य प्राचार्य किसनराव रत्नपारखी यांनी देखील रयत संस्थेच्या माध्यमातून येथील नवीन इमारत उभारणी कामी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.

सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या  १० वर्गखोल्यांच्या या इमारतीच्या बांधकामास नुकतीच सुरुवात झाली असून यात अत्यावश्यक सुविधांसह या  इमारतिचे अद्ययावत बांधकाम होणार असल्याची माहिती नेहा कंस्ट्रक्शनचे संचालक शिरीषकुमार रोडे यांनी आमच्या प्रतिनीधीशी  बोलताना   दिली.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या