विठ्ठलवाडीकर दिवाळी पहाटेत झाले ओलेचिंब !

विठ्ठलवाडी ,  ता.२ नोव्हेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) :  येथे दिवाळी पाडव्यानिमित्त अायोजित केलेल्या दिवाळी पहाट संगीत मैफल कार्यक्रमात विठ्ठलवाडीकर अक्षरश: चिंब न्हाउन गेले.

विठ्ठलवाडी ग्रामस्थ व विविध मंडळांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट संगीत मैफल कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आकाशवाणी व दूरदर्शन कलाकार पं. हरिश्‍चन्द्र गवारे, सरपंच अलका राऊत, गायक डॉ. राजश्री महाजनी आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.या वेळी गायन डॉ. राजश्री महाजनी यांनी सादर केले. त्यांना, तबला साथ श्रीपाद पोरे, हार्मोनियम साथ अमोल जोशी, तर तालवाद्य साथ प्रसाद भावे यांनी केली.

या मैफलीचे निवेदन गजानन महाजनी यांनी केले.दिवाळी पहाट या अायोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विविध  भक्तिगीते व संतांचे अभंग यांचे राजश्री महाजन यांनी गायन व सादरीकरण केले.उत्कृष्ट तबल्याची साथ व रसिकांनी दिलेली दाद या मुळे विठ्ठलवाडीत पहाटेच्या दवात भक्तिमय वातावरण प्रथमच अनुभवयास मिळाले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक संभाजीअप्पा गवारे, सोसायटीचे उपाध्यक्ष रायचंद शिंदे, संचालक लव्हाजी लोखंडे, उपसरपंच दिलीप गवारे. राजेंद्र शिंदे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे, उपाध्यक्ष बापू पवार, ग्रामपंचायत सदस्य जयेश शिंदे, बाबाजी गवारे, ललिता गाडे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष किसन गवारे, शिरूर तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप, प्रा. संदीप गवारे, उद्योजक संतोष गवारे, युवराज गवारे, संभाजी शिंदे, हिरामण गवारे मृणाल दरेकर, प्रकाश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पं. हरिश्‍चन्द्र गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यास प्रा. संदीप गवारे, दिनेश राऊत, प्रवीण जगताप, मृणाल दरेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या