भाजपा नेत्यांचे हेच का अच्छे दिन ?

शिरूर, ता. ५ नोव्हेंबर २०१६ (मुकुंद ढोबळे) : साईकृपा साखर कारखाना हिरडगाव या कारखान्याने शिरूर तालुक्यातील 429 शेतकऱ्यांच्या उसाचे 2 कोटी  58 लाख रुपयांचे विविध बँकेचे दिलेले चेक वटले नसल्याने भाजपा नेते माजी मंत्री बबनराव पाचपूते यांचा खोटारडे पणा समोर आला आहे.भाजपा नेत्यांचे हेच का अच्छे दिन असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.       

शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे  हिरडगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील साईकृपा शुगर अॅड अलाईड इंड. लि. युनिट 2या कारखान्याने सन २०१४-२०१५ या कालावधीतील ऊस गाळपाचे पैसे दिले नाही.या संदर्भात शिवसेनेचे शेतकरी सेलचे तालुका संघटक योगेश ओव्हाळ, माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी खेडकर, शेतकरी संघटना यांनी शेतकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन,जोड़े मारो आंदोलन,रास्तारोको असे अनेक आंदोलने केली.

परंतु कारखान्याचे संचालक मंडळ यांनी खोटी लेखी आश्वासन दिली होती.दरम्यान या संघटनांनी पुन्हा आंदोलन केले.त्यावेळी  शिरूर चे तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे  यांनी मध्यस्थी केली होती कारखाना संचालक यांनी आंदोलना दरम्यान दोन कोटी अठ्ठावन्न लाख रूपयाचे 37 चेक शेतक-यांना दिले होते.

हे चेक बँकेत भरले असता हे चेक वटले नसल्याने ते रिटर्न आले आल्याने शेतकरी संतप्त झाले असून,या दिवाळीत तरी उसाचे पैसे मिळतील अशी अाशा शेतक-यांना होती. परंतु हि अाशा फोल ठरत दिलेले चेक न वटल्याने शेतक-यांची दिवाळी कोरडी गेली. तर भाजपा सरकारचे हेच का अच्छे दिन असे ही चर्चा शेतकरी वर्गात अाता मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.आता पर्यंत सदोतीस चेक पैकी 13 चेक न वटता परत आले तर इतर चेकही वटले नसून याबाबत बँक अधिका-यांनी हे चेक पाचपूते यांच्या सांगण्यावरुन दाबून ठेवले असल्याचा आरोप शिवसेना शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष योगेश ओव्हाळ् यांनी केला आहे.

या साईक्रूपा कारखाना  भाजपा नेते माजी मंत्री बबनराव पाचपूते यांचा अाहे तर  कार्यकारी संचालक राजकुमार एस .ढमढेरे (रा .एन 4,तिरुपती पार्क सिडको,औरंगाबाद), संचालक विक्रमसिंह बी .पाचपुते (रा .काषटी ,श्रीगोंदा ,अहमदनगर ),शिवाजीराम एन अनभूले (रा .सावेडि ,अहमदनगर ),व इतर संचालक मंडळावर आहेत.
      
यावेळी बोलताना आंदोलन कर्ते शिवसेना शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष  योगेश ओव्हाळ म्हणाले कि, साईकृपा साखर कारखाना हिरड्गाव या कारखान्याने गेली सत्तावीस महीन्यांपासून शिरूर तालुक्यातील साडेचारशे शेतकऱ्यांचे उसाचे कोट्यावधी रुपये थकवले असून या संभ्रमात अनेक वेळा आंदोलन केल्यानंतर या कारखान्याने शेतकऱ्यांना दोन कोटी अठ्ठावन लाख रूपयाचे चेक दिले होते. परंतु हे चेक बँकेत पैसे नसल्याने वटले नाहीत. यामुळे भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी शिरुर च्या शेतक-यांची घोर फसवणूक केली आहे.
      
शिवाजीराव खेडकर आर टी आय कार्यकर्ते या वेळी बोलताना म्हणाले कि,शिरूर तालुक्यातील साडेचारशे शेतक-यांना उसाचे दोन कोटी रूपयाचे चेक दिले.परंतु हे चेक वटले नाही त्यामुळे ज्या भाजपाला शेतकरी वर्गाने मोठ्या आशेने निवडून दिले. परंतु त्यांचे नेते शेतक-यांची अशा पद्धतीने फसवणूक करतात. हेच का ते  भाजपा चे अच्छे दिन? असा सवाल त्यांनी करून हे चेक वटले नसताना बँक कर्मचा-यांनी चेक 138 ची कार्यवाही होऊ नये म्हणून दाबून ठेवल्याचा आरोप त्यांनी करून भाजपा नेते बबनराव पाचपुते यांना वाचवण्यासाठी संगनमताने  हा खेळ रचला असल्याचे सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या