शिरुर नगरपालिकेची निवडणुक बहुरंगी होणार ?

शिरूर, ता. ५ नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) : शिरुर नगपालिकेची निवडणुक अगदी उंबरठ्यावर अाली असताना इच्छुकांमध्ये सामसुमच असुन भाजपा,शिवसेना,मनसे,यांच्यासह तिसरी अाघाडी देखिल रिंगणात उतरणार असल्याने हि निवडणुक बहुरंगी होणार का ? अशा चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत अाहे.

सध्या शिरुर नगरपालिकेवर प्रसिद्ध उद्योगपती रसिकलाल धारिवाल व प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरुर शहर विकास अाघाडीची एकहाती सत्ता अाहे.या निवडणुकित नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला अारक्षण अाल्याने माजी नगराध्यक्ष रसिकलाल धारिवाल यांच्या स्नुषा दिना धारिवाल यांच्या नावाची चर्चा नागरिकांमध्ये रंगु लागली अाहे.

दरम्यान निवडणुक अगदी उंबरठ्यावर अाली असताना सेना-भाजप या पक्षांत असलेली शांतता व अद्याप स्पष्ट न झालेली भुमिका या मुळे कार्यकर्ते माञ गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसुन येते.

या निवडणुकित तिसरी अाघाडी ने शड्डु ठोकुन प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले असले तरी तिसरी अाघाडी खरंच करिश्मा दाखविणार का ? कितपत प्रभाव पाडण्यात यशस्वी होणार याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागुन राहिली अाहे.

दुसरीकडे सोशल मिडियावर माञ वोट पोल सुरु असुन इच्छुक उमेदवार अाम्हांलाच  वोट करा असे अावाहन देखिल करत असुन तशा चर्चा अाता सोशल मिडियावर रंगु लागल्या अाहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या