विचिञ अपघातात १ ठार तर सात जखमी

रांजणगाव गणपती , ता. ६ नोव्हेंबर २०१६ (प्रतिनीधी) :  पुणे नगर हायवेलगत कोंढापुरी (ता.शिरुर) येथील हद्दीत झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात १ ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली.

ट्रॅकटर, टाटा मॅजिक छोटा टेम्पो व दुचाकीच्या झालेल्या अपघातातील जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शिक्रापूर व वाघोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती रांजणगाव गणपती पोलीस स्टेशनने दिली आहे.

या अपघातात टाटा मॅजिक गाडीतील सचिन बिडवाई (रा.जुन्नर ) हे ठार झाले तर टाटा मॅजिक मधील लक्ष्मण तुकाराम डाळींबकर, वय २४ (रा.बाभुळसर) ,नितीन गणपत पवले वय २७, रणजित बालाजी सुरवसे वय २३, चद्रंकांत दिगंबर कटेरमल वय ३०, सर्व रा. शिक्रापूर व हजारीलाल श्रीश्रम सैनी वय २७ (रा.चाकण) या ५ जखमीवर शिक्रापूर येथील तर दुचाकीवरील औदुंबर वाघमारे ,पंकज माने रा.सोलापूर यांच्यावर वाघोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


या अपघाताबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता.५ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास टाटा मॅजिक गाडी शिक्रापूरहून रांजणगाव एमआयडीसीत जात असतांना कोंढापुरी हददीत पुणे नगर हायवेवर सार्वजनिक बांधकाम विभागाचा ट्रॅक्टर रस्ता दुरुस्तीचे साहित्य घेऊन थांबलेला होता. या ट्रॅकटर ट्रॅालीला मॅजिक गाडीने जोरदार धडक दिली आणि याच वेळी पाठीमागून येणारी दुचाकीही येऊन धडकली आणि अपघात झाला. या अपघाताच गुन्हा रांजणगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून ट्रॅकटर चालक अशोक लक्ष्मण मुळे रा. जामखेड यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पुढिल तपास रांजणगाव पोलीस करत अाहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या