कोल्हापुर प्रमाणे पुणे जिल्हयातही बैठक व्हावी- जगताप

मांडवगण फराटा , ता. ८ नोव्हेंबर २०१६ (राजेंद्र बहिरट) :  कोल्हापुर जिल्हयात शासनाचे प्रतिनीधी,कारखानदार व  शेतकरी प्रतिनीधी यांच्यात एफअारपीबाबत नुकतीच बैठक झाली. त्या बैठकित एफ अारपी अधिक १७५ रुपये द्यायचे अशा पद्धतीचा निर्णय जाहिर झाला असला तरी तो निर्णय  अजुन तरी खाञीशीर वाटत नाही. कोल्हापुर प्रमाणे त्याच पद्धतीची बैठक पुणे जिल्ह्यात व्हावी अशी अपेक्षा असुन याबाबत लवकरात लवकर चिञ स्पष्ट व्हायला हवे असे मत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.


सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चालुवर्षी साडेअाठ लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट असुन पुणे जिल्ह्यात विघ्नहर साखर कारखान्याच्या नंतर  सर्वात जास्त उस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेञात उपलब्ध अाहे.त्यामुळे  स्वत:चा साडेसहा लाख टन व  उर्वरित उस गेटकेन चा मिळवायचा

मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील सहकारी सोसायटीच्या भेटीप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, गेल्या सहा महिन्यांपासुन केंद्र व राज्य सरकार ने साखर धंद्याविषयी धरसोडी चे धोरण अवलंबिवल्यामुळे कारखानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असुन शेतक-यांना तोंड कसे द्यायचे कसे असा  प्रश्न कारखानदारांना पडला अाहे. तसेच माळेगाव व सोमेश्वर या बारामती तालुक्यातील दोन कारखान्यांनी २४०० एफअारपीची सर्वाधिक रक्कम दिली अाहे.

सोमेश्वर कारखाना हा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरळितपणे सुरु असुन अाम्ही ठरल्याप्रमाणे २४०० एफअारपी देणारच परंतु जिल्हयाचे जे धोरण ठरेल त्या प्रमाणे देउ अशी ग्वाही दिली.तसेच चालु वर्षी चांगला पाउस झाला अाहे.त्यामुळे पुढील वर्षासाठी  सोमेश्वरच्याच  कार्यक्षेञात सुमारे११ लाख टनापर्यंत उस उपलब्ध  होणार अाहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या या भागातील उस गाळपासाठीची शाश्वती अाताच  देउ शकणार नाही.पण गरज पडली तर उस नक्की नेला जाईल असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन दादापाटील फराटे, सोमेश्वर चे संचालक किशोर भोसले, भरत खैरे, सोमेश्वर चे उस विकास अधिकारी मच्छिंद्र निंबाळकर, सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम शितोळे, गोविंदतात्या फराटे,संभाजी फराटे, वैभव फराटे, अादी उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या