...अखेर जखमी नागाची झाली सुखरुप सुटका

बाभुळसर बु. , ता. ८ नोव्हेंबर २०१६ (राजेंद्र बहिरट) : मुंगुस व नाग यांच्या चाललेल्या झटापटीनंतर मुंगसाच्या हल्ल्यापासुन अापले प्राण वाचविण्यासाठी तब्बल चार तास उसाच्या शेवटच्या शेंड्यावर वाढ्यालगत चढुन बसलेल्या जखमी नागाची अखेर सर्पमिञाला पाचारण केल्यानंतर  सुखरुप सुटका करण्यात अाली.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी कि, बाभुळसर बुद्रुक (ता.शिरुर) येथील शेतकरी दत्ताञय दगडु नागवडे यांच्या घरालगत उसाचे शेत अाहे.दुपारच्या सुमारास पक्ष्यांचा किलबिलाट होउ लागल्याने घरातील सदस्यांनी घरालगत येउन पाहिले असता, नाग व मुंगसाचे भांडण सुरु असल्याचे दिसले.

या वेळी चाललेल्या झटापटीत नाग हा अत्यंत जखमी झालेल्या अवस्थेत प्राण वाचविण्यासाठी उसाच्या शेंड्यावर तब्बल चार तास बसुन राहिला. अखेर तांदळी येथील सर्पमिञ सुनिल कळसकर यांनी बोलावण्यात अाले.कळसकर यांनी या ठिकाणी धाव घेउन या सापाची सुखरुप सुटका केली व निसर्गाच्या सान्निध्यात सोडुन दिले.

या सापाबद्दल कळसकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि हा अतिविषारी  कोब्रा जातीचा नाग असुन लांबी चार फुट, तपकिरी रंगाचा अाहे.सर्पमिञ शरद गदादे, विक्रम शिंदे, गणेश अहिवळे,कमलेश गुंजाळ,मनोज चौधरी,किरण कळसकर यांनी या कामी मोलाची मदत केली.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या