शिरुर ला ग्रामसेवकांचे 'असहकार' अांदोलन

शिरूर, ता. ८ नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) : ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून(ता.७) महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. दिवसभर पंचायत समितीसमोर धरणे धरण्यात आले.

कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांना दरमहा पगाराबरोबर तीन हजार रुपये भत्ता देणे, ग्रामसेवक संवर्गाची शैक्षणिक अर्हता बदल करावी, २०११च्या लोकसंख्येच्या आधारित ग्रामविकास अधिकारी सजेची व पदांची निर्मिती करावी, ग्रामसभेची संख्या र्मयादित असावी. मनरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ग्रामसेवकांसाठी वैद्यकीय कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी, राज्यस्तरावर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा सुरू करावा, १२ जून २०१३च्या विनाचौकशी फौजदारी केसेस हे परिपत्रक मागे घ्यावे, २० ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी पदनिर्मिती करावी, समाजकल्याण विस्तार अधिकारी, केंद्रपुरस्कृत विस्ताराधिकारी पद निर्माण करावा.

सन २०१५नंतर सेवेत रुजू झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, ग्रामसेवक संवर्गाचा सुधारित जॉब चार्ट तयार करावा, राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामसेवकांवरील चुकीची कार्यवाही रद्द करावी व ३९ निलंबित ग्रामसेवकांना पुन्हा सेवेत घ्यावे, ग्रामसेवकांवर सातत्याने होणार्‍या हल्ल्यासंदर्भात अजामीनपत्र गुन्हा दाखल व्हावा आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी आजपासून असहकार आंदोलन सुरू केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या