दिवाळीनंतर अनेकांचं लागलं दिवाळं!

शिरूर, ता. १२ नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानकच ५०० व १०००च्या नोटा चलनातुन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात त्यांच्या या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत  असुन दिवाळी झाल्यानंतर अनेकांचं दिवाळं निघलं असल्याची चर्चा ठिकठिकाणी रंगु लागली अाहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानकच ५०० व १०००च्या नोटा चलनातुन बंद करण्याचा निर्णयानंतर गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे दिसत अाहेत. पैसे अाहेत पण सुटटे नाहीत, घर खर्चात देखिल अनेकांची सध्या काटकसर सुरु असुन स्रवसामान्यांनाच याचा  मोठा फटका बसत असल्याचे चिञ अाहे.सध्या सगळ्यांकडेच ५०० व १०००च्या नोटा जवळ असल्याने बाजारपेठेत सुट्टे पैसे मिळविण्यासाठी चांगलाच  अाटापिटा करावा लागत अाहे.सोने जेव्हा  स्वस्त होते तेव्हा माञ खरेदीसाठी पतिराजांकडुन टाळाटाळ होत असल्याचे या पुर्वीचे चिञ होते परंतु अाता मोदींच्या निर्णयानंतर पतीराजांकडुन पत्नी मागणी न करता देखिल जास्त पैसे  देउन सोने खरेदी करण्यासाठी  नामांकित सोने व्यापा-यांकडे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली अाहे.प्रसारमाध्यमांतुन या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर देखिल हि माहिती सर्वांपर्यंत पोहोचली असे नाही. तर अद्याप हि ब-याच गोरगरिब जनतेचा या बाबत फारशी माहिती मिळत नसल्याने गोंधळ उडाला असुन  कष्टकरी जनता,रोजंदारीवरील महिला या निर्णयाबाबत अनभिज्ञच असुन नोटा बंद झाल्यात पण अाहे त्या जुन्या नोटांचं करायचं काय याबाबत प्रश्न उपस्थित करु लागली अाहेत.त्यामुळे सरकारने या निर्णयाबाबत वाड्या वस्त्यांवरदेखिल जनजागृती करणे गरजेचे अाहे.  

गेल्या दोन दिवसात नोटा बदलण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी बँकेत सलग दुसर्‍या दिवशी शिरुर  शहर व तालुक्यात  मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शुक्रवारी एटीएम सुरू होणार असे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी एटीएम बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. जी एटीएम सुरू होती, त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रांगा होत्या. दुसर्‍या दिवशी ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी नवीन नोटा उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंदही दिसून येत होता.अनेकांनी नोटा प्रथमच हाती अाल्याने समाधान व्यक्त करत सोशल मिडियावर पोस्ट केल्या जात होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा दि. 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी (दि. 9) बँका, एटीएम केंद्रे बंद होती. दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.11) रोजी सर्वच बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. नागरिकांनी सकाळपासूनच बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून आले. पाचशेच्या नोटा बाजारातून बाद करण्याच्या निर्णयाचे पडसाद तालुक्यातील  कानाकोप-यात दिसून आले. बँकांमध्ये सकाळपासूनच रांगेत उभ्या असलेल्या काही नागरिकांना चक्कर येण्याचे प्रकार घडले. तासन् तास रांगेत उभे राहिल्याने वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.


दैनंदिन व्यवहारांतून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर त्याच वेळेपासून पेट्रोल पंप चालकांनी सुटे पैसे द्यावे लागतील यासाठी पाचशेच्या पटीत पेट्रोल भरण्याबाबतचे फलक लावायला सुरवात केली. पाचशे आणि हजार रुपयांची नोट स्वीकारण्यात येत होती.पाचशे रुपये देत आहात, तर तेवढ्याच रकमेचे पेट्रोल भरा. कारण परत देण्याकरिता सुटे पैसे नाहीत, असे सांगून पंपांवरील कर्मचारी सक्तीने पेट्रोल भरून घ्यायला लावत होते. कमी किमतीचे पेट्रोल भरून उरलेले पैसे स्वखर्चासाठी ठेवायचे म्हणून काही नागरिक शंभर, दोनशेच्या पटीत पेट्रोल भरण्याची मागणी करीत होते. तेव्हाही सुटे पैसे असतील तर पेट्रोल देऊ असेच पंपांवर कर्मचारी सांगत होते. त्यामुळे नाइलाजास्तव अधिक किमतीचे पेट्रोल भरावे लागत होते. पण सुटे पैसे नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना मात्र बऱ्याचवेळ ताटकळत राहावे लागत होते.तर ज्यांच्याकडे लाखांच्या पटीत जास्त रक्कम अाहे त्यांचं माञ दिवाळं निघालं असुन अनेकजण अॉफर देत असल्याची चर्चा देखिल सर्वसामान्य नागरिकांमध्ये पहावयास मिळत होती.

ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठांमध्ये देखिल गर्दी रोडावली असुन किरकोळ व्यापार वगळता पैशाअभावी सर्वच ठिकाणी खरेदी कमी होत  असल्याचे चिञ दिसुन येत होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या