सुट्टे पैसे मिळतच नसल्याने ञास होतोय सामान्यांना

मांडवगण फराटा , ता. १५  नोव्हेंबर २०१६ (राजेंद्र बहिरट) : सध्या गावा गावांत भरणा-या यांञांमध्ये सुटट्या पैशांचा वांदा झाल्याने अनेक गावातील याञांवर सुट्ट्या पैशांअभावी याञांवर परिणाम झाल्याचे चिञ दिसुन येउ लागले अाहे.तसेच ठिकठिकाणचे अाठवडे बाजार देखिल सुट्टे पैसे मिळत नसल्याने  ओस पडु लागली अाहेत.

वडगाव रासाई,मांडवगण फराटा, तांदळी,इनामगाव, अादी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखांनी अद्यापी फारशा प्रमाणात नवीन नोटा  उपलब्ध  होत नसल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय  होउन त्याचा फटका भरणा-या अाठवडे बाजारांवर  दिसुन येत अाहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील कुरुळी, शिरसगाव काटा,सादलगाव,कोळगाव डोळस,गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक, अादी गावातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर अवलंबुन अाहेत. त्यामुळे रोखीच्या स्वरुपात होणारे व्यवहार करण्यास अडचणी येत  अाहे.वडगाव रासाई येथील अाठवडे बाजारात पैश्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे काहि व्यापा-यांनी तर नागरिकांना उधारीवर भाजीपाला दिला जात होता.पण या मध्ये मोलमजुरी करणारे, उसतोडी करणारे कामगार,परप्रांतिय,रोजंदारी करणा-या महिलांना उधार देखिल मिळत नसल्याने त्यांना बाजार खरेदी करताना चांगलाच  अाटापिटा करावा लागत असल्याचे बाजारपेठेत ठिकठिकाणी चिञ दिसुन येत होते.


पेट्रोलपंपावर अद्यापी माञ चिञ बदलले नसुन जेवढ्या जुन्या ५०० व १००० च्या नोटा द्याल तेवढ्याच पैश्यांचे पेट्रोल डिझेल  नाइलाजास्तव सामान्य नागरिकांना पेट्रोल खरेदी करावे लागत होते.तर अनेक पेट्रोल पंपावर १००० व ५०० च्या नोटा न घेण्यावरुन वाहनचालक व पेट्रोलपंप कर्मचा-यांध्ये वाद होत असल्याचे दिसत होते.

सध्या तुळशीच्या लग्नानंतर  लगीनसराई सुरु झाली असुन माञ यामध्ये खरेदी करण्यासाठी वधु व वर पित्याला एकरकमी रक्कम गोळा करण्यासाठी १००० व ५०० च्या नोटा  सोडुन उर्वरित नोटा जमा करण्यासाठी अक्षरश:  तारांबळ होत असल्याचे दिसुन येत  असुन बॅंकेत माञ  ठराविक मोजकिच रक्कम मिळत असल्याने लग्नासाठी लागणारी  बाकिची रक्कम कशी गोळा करायची? अशी चिंता वर व  वधुपित्याला पडली अाहे. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या