'सृजन व्हिलेज' ने 'त्या' चेह-यावर फुलविले हास्य

शिरूर, ता. १५  नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) : देशभरात बालदिन उत्साहात साजरा होत असतानाच कॅन्सरग्रस्त चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी  सृजन व्हिलेज या वाॅट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी अवघ्या पाच तासात त वैद्यकीय उपचारासाठी लाखमोलाची मदत जमा करत चिमुकल्याच्या चेह-यावर ख-या अर्थाने हास्य फुलविले अाहे.

सविस्तर माहिती अशी कि, बार्शी येथील स्नेहग्राम प्रकल्पाचे प्रमुख महेश निंबाळकर हे  सध्या पुण्यात डेक्कन परिसरात सहका-यांसोबत वंचित मुलांसाठी काम करत अाहेत.निंबाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यभरातील विविध क्षेञात सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सेवाव्रतींसह,पञकार,अधिकारी,उद्योगपती,यांचा समावेश असलेला 'सृजन व्हिलेज' नावाने वाॅट्सअप ग्रुप बनवला होता.या ग्रुपच्या माध्यमातुन राज्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणा-या संस्था व व्यक्ती यांना पाठबळ देण्याबरोबरच आर्थिक मदतीचा हातभार लावला जातो.

दरम्यान 'द सावली फाऊंडेशन'या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सायली धनाबाई यांनी  सृजन व्हिलेज या वाॅट्सअप  ग्रुपवर हडपसर येथील शुभराज कुणाल शिंदे या दीड वर्षीय बालकास कॅन्सर झाला असुन त्याच्या उपचार करण्यासाठी शिंदे कुटूंबाकडे आर्थिक सक्षमता नसल्याचे सांगत शुभराज या बालकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे अवाहन वाॅट्सअप पोस्टद्वारे केले होते.त्यानुसार या ग्रुपवरिल सदस्यांनी सायली धनाबाई यांच्या अवाहनास प्रतिसाद देत अवघ्या पाच तासात 79 हजार रूपयांचा मदत निधी उभा करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.

शुभराजच्या उपचारासाठी सृजन व्हिलेज ग्रुपचे सदस्य किर्ती ओसवाल यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 50 हजाराची मदत कस्तुररत्न फाऊंडेशन च्या माध्यमातून केली याशिवाय आपलं घर प्रकल्पाचे विजय फळणीकर यांनी 8500,अजित फाउंडेशन बार्शी 5000,मधु लळिंगकर 5000,पुनित खटावकर 5000,गंगाधर सत्वधर 1500,मिलिंद पगारे 1000, किरण फरांदे 1000, प्रेरणा चव्हाण 1000, दत्ताञय इंगळे 1000 या सदस्यांनी तातडीने मदत केली.

या बाबत  निंबाळकर यांनी संकेतस्थळाशी बोलताना अधिक माहिती देताना सांगितले कि, शुभराजला उपचारासाठी अजुनही तीन लाख रूपयांची गरज आहे.त्यासाठी सामाजिक बांधिलकीतून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज अाहे.

दरम्यान शुभराजच्या उपचारांसाठी या ग्रुप ने दाखवलेल्या  तत्परतेबद्दल या ग्रुप चे मोठे कौतुक होत अाहे .तसेच या चिमुकल्याच्या  पुढील मदतीसाठी सृजन व्हिलेज ग्रुपचे महेश निंबाळकर 9405024613 व सावली फाऊंडेशनच्या सायली धनाबाई 9890687074 यांच्याशी संपर्क करावा अवाहन करण्यात आले आहे.  
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या