'साईकृपा' विरोधात शेतक-यांचे धरणे अंादोलन

कवठे यमाई , ता. २१  नोव्हेंबर २०१६ (सुभाष शेटे) : हिरडगांव येथील  साईकृपा साखर कारखान्याने दिलेले चेक बाउंस झाल्याने सन २०१४-०५ मध्ये या कारखान्यास ऊस घालणारे  शेतकरी संतप्त झाले असुन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शिरूर तालुक्यातील शेतक-याचे उसाचे बील त्वरित द्यावे  म्हणून आता  शिरूर तालुक्यामधील  मुखई, धानोरे ,वाजेवाडी,मलठण ,आंबळे या ठिकाणी,करखान्याचे मालक बबनराव पाचपुते यांच्या विरोधात 16 नोव्हेम्बर पासून धरणे आंदोलन सुरु केले आहे.

बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील  हिरडगांव च्या साईकृपा साखर कारखान्याला सन 2014-2015 च्या गळित हंगामात या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उस दिला होता, उसाचे थकीत बिल मिळावे म्हणून अनेकदा पाठपुरावा करून ही शेतक-यांना उसाचे पैसे मिळेनात. या बाधित शेतक-यांनी  शिरूर येथे दोन वेळा आंदोलन केले होते.परंतु या कारखाना मालकाला काही फरक पडला नाही,शेतक-यांच्या उसाच्या बिलापोटी साईकृपा कारखान्याने जे चेक दिले ते सर्व बाउंस झाले आहेत, गेले 28 महीने बबनराव पाचपुते सर्व शेतकऱ्यांना फसवत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिरूर तालुक्यातील सुमारे २०० शेतकऱ्यांचे जवळपास  2 कोटि रुपये थकित आहेत. या प्रकरणी प्रशासन, लोकप्रतिनिधी कोणीच लक्ष्य घालत नाहीत.शेवटी एक सामाजिक बांधिलकी म्हणुन तालुका शेतकरी शिवसेनेचे अध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित शेतक-यांना या प्रश्नी  वेळोवेळी आंदोलने,रास्तारोको  करत शेतक-यांना पैसे मिळावेत म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला आहे.शिरूर तालुक्यातील शेतक-यांना साईकृपा साखर कारखान्याने दिलेले चेक बाउंस झाल्याने आता शिरूर तालुक्यातील मुखई, धानोरे ,वाजेवाडी,मलठण ,आंबळे या  ५ गावातील सुमारे २००  शेतकऱ्यांनी आपापल्या गावात आंदोलन सुरु केलेय.काल आंदोलनकर्त्यांनी बबनराव पाचपुते यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

शेतक-यांचे उसाचे बिल मिळण्याच्या या महत्वपूर्ण प्रश्नी सर्वांनी राजकारण बाजुला ठेऊन या सत्य विषयाचे  गांभिर्य  लक्षात घेऊन आंदोलन बळकट करावे.आणि बबनराव पाचपुते यांच्या विरोधात आवाज उठवून गरीब सामान्य शेतकरी बांधवांचे पैसे देण्यास भाग पाड़ावे असे आवाहन योगेश ओव्हाळ यांनी केले.तर बबनराव पाचपुते यांनी थकीत उसाचे बिल त्वरित न दिल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवत पिडीत शेतक-यांसह पुणे-अहमदनगर रोडवर रास्ता रोको व आत्मदहनाचा इशारा शेतक-यांनी दिला अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या