कालिकामाता विद्यालयाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आगेकूच

वाघाळे , ता. 22 नोव्हेंबर 2016: सोलापूर येथे झालेल्या विभागीय खो-खो स्पर्धेत वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालयाने विजेतेपद पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आगेकूच केली.

सोलापूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात अहमदनगर (ग्रामीण) संघावर 1 डाव व 12 गुणांनी विजय मिळविला. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढत औरंगाबाद येथे होणाऱया 62व्या राज्य स्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आगेकूच केली. अंतिम सामन्यात राष्ट्रीय भरत पुरस्कार विजेता शुभम थोरात नाबाद 4 मिनिटे संरक्षण व 5 गडी बाद केले. साहिल चिखले याने अडीच मिनिटे संरक्षण व 4 गडी बाद केले. राहुल देशमुख व संदेश बढे यांनी आक्रमक खेळी करत 5 गडी बाद केले. प्रणव खळदकर, स्वप्निल डोळस, अमन बढे व विशाल दुर्गे या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. सोलापूरचे जिल्हाधिकारी युवराज नाईक यांनी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी शिरूर तालुक्यातून कालिकामाता विद्यालायचा पहिलाच संघ पात्र ठरला आहे. गावचे माजी आदर्श सरपंच कुंडलिकराव थोरात, दिलीप थोरात, संदीप धायबर, ओंकार थोरात, योगेश शेळके, शरद धायबर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव आगरकर, शिक्षक संजय मचाले, सतीशचंद्र पाटील व धीरज दंडवते यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या