पोलीस व पञकारांचे अारोग्य तंदुरुस्त असणे गरजेचे

रांजणगाव गणपती , ता. २४  नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) : समाजासाठी चोवीस तास अॉन डयुटी काम करणा-या पोलीस व पञकार या दोन्ही घटकांनी अारोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत प्रा.सतीश धुमाळ यांनी पोलीस मैदान उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

रांजणगाव पोलीस स्टेशन येथे  अत्याधुनिक खेळाच्या मैदानाचे उद्घाटन शिरुर व रांजणगाव परिसरातील पञकारांच्या हस्ते करण्यात अाले.
या वेळी पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पञकार तेजस फडके, पञकार पोपट पाचंगे, पञकार सतीश केदारी,ग्रामस्थ  व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस कर्मचा-यांना दैनंदिन धावपळीच्या व कामाच्या ताणामुळे अारोग्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते.त्यामुळे विविध व्याधींना सामोरे जावे लागते.ते टाळण्यासाठी पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पोलीस अधिक्षक जय जाधव यांच्या संकल्पनेतुन व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार रांजणगाव पोलीस स्टेशन ने एक एकर परिसरात अडगळीची जागेची साफ-सफाई करुन क्रिेकेट,हॉलिबॉल,व रनिंग ट्रॅक साठी मैदान तयार केले.

यावेळी रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी बोलताना सांगितले कि, कर्मचा-यांना कामाच्या ताणातुन उसंत मिळुन अारोग्याकडे विशेष लक्ष देता यावे या साठी पोलीस स्टेशन च्या नजीक मैदान बनविण्यात अाले अाहे.पुणे जिल्ह्यात रांजणगाव पोलीस स्टेशन ने सर्वप्रथम मैदान बनविले  अाहे. या माध्यमातुन परिसरातील शालेय विद्यार्थी, काम करणारे परिसरातील कर्मचारी,महिला यांना देखिल  मैदान खुले करण्यात अाले असुन ग्रामस्थांनी देखिल याचा वापर करावा असे  अावाहन त्यांनी केले.त्याचबरोबर लवकरच अारोग्य शिबिर भरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मैदान तयार करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुनिल क्षिरसागर, राजु मोमीन, व इतर कर्मचा-यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सुञसंचालन पोपट पाचंगे यांनी केले तर अाभार तेजस फडके यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या