भिंतीवर थुंकुंच नये म्हणुन अजब शक्कल !

शिरूर, ता. २५ नोव्हेंबर २०१६ (प्रतिनीधी)  :  सार्वजनिक कार्यालयात नागरिक नेहमीच अस्वच्छेतेचे प्रदर्शन करत भिंती अन इतर ठिकाणी अस्वच्छता  करत असताना शिरुर च्या अशाच एका  कार्यालयात प्रवेश करताना नागरिकांनी थुंकुच नये म्हनुन अजब कल्पना लढवण्यात अाली असुन त्या प्रकारामुळे अस्वच्छता  देखिल कमी झाल्याचे दिसते. परंतु नक्की काय अाहे हा प्रकार जाणुन घ्या.

शिरुर तालुक्यात महत्त्वाचे शासकिय कार्यालय समजल्या जाणा-या शिरुर तहसिल कार्यालयाच्या इमारतीच्या अावारात घाणीची  अवस्था सर्वांनाच माहिती अाहे.शिरुर तहसिल कार्यालयाची इमारत अद्ययावत जरी असली तरी स्वच्छतेसाठी माञ शासकिय निधी उपलब्ध होत नसल्याने या पुर्वी केलेल्या पाहणीत शौचालये व सर्वच भाग अपवाद वगळता घाणीने डबडबला होता.या मध्ये प्रथमत: मुख्य इमारतीत प्रवेश करतानाच जिन्यात नागरिकांनी गुटखा,पान, तंबाखु खाउन पिचका-या मारुन भिंती घाण केल्या होत्याचे चिञ होते.त्यामुळे जिन्यापासुन प्रवेश करत असतानाच अस्वच्छतेचे दर्शन घडत  असे.

परंतु काल(ता.२४) रोजी शिरुर तहसिल कार्यालयाच्या इमारतीत नागरिकांच्या प्रश्नांबाबत सेतु कार्यालय बंद असल्याने होणारी गैरसोय बाबत माहिती घेण्यास जात असतानाच पहिल्याच जिन्यात देवतांचे फोटो चिकटविलेले दिसले.उत्सुकतेपोटी निरखुन पाहिले असता चिञाच्या शेजारीच 'थुंकु नये' असे देखिल ठळक अक्षरात लिहिले असल्याचे दिसते.

या पुर्वी चे चिञ पाहिले असता याच भिंती घाणीने बेजार झाल्या होत्या परंतु अाता त्या ठिकाणच्या देवदर्शनाने माञ भिंती स्वच्छच राहत असल्याचे दिसते.

याबाबत शिरुर च्या तहसिलदारांना भेटण्याचा प्रयत्न केला असता,तेथिल कर्मचा-याने साहेबांना अाता भेटता येणार नाही असे सांगितले.

सगळिकडे स्वच्छता  अभियान जोरात  असताना इमारतीत प्रवेश करताना भिंतीवरील देवदर्शनाने मंदिरात कि सरकारी कार्यालयात प्रवेश केला अाहे याचा संभ्रम माञ पडला.

एकमाञ नक्की अाता नागरिकांनी देवदर्शन घेउन  भिंती देखिल रंगविणे थांबविले अाहे.तु्म्हांला काय वाटते या बदद्ल ?
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या