विठ्ठलवाडीत विद्यार्थ्यांचे २० वर्षांनी 'बॅक टु स्कुल'

विठ्ठलवाडी ,  ता.२५ नोव्हेंबर २०१६ (प्रा.एन.बीे.मुल्ला) : येथील श्री पांडूरंग विद्यालयात स्नेह मेळाव्यानिमित्त विद्यालयातील 1996 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा 20 वर्षानंतर वर्ग भरल्याने एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.

तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकदा आपण एकाच वर्गात बसलो याचा एक वेगळा आनंद प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता.प्रत्येकजण जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत होता.या शाळेतील अनेक विद्यार्थी उच्च पदावर व प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत तर कांहीनी उद्योगधंद्यात नावलौकीक मिळविला आहे अशा सर्व विदयार्थ्यांचे शिक्षकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला साउंड सिस्टीम भेट दिली.या कार्यक्रमास मुख्याध्यापक राजाराम नजन, शिरूर तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रविण जगताप, सुरेश थोरात, भाउसाहेब वाघ, प्रभाकर चांदगुडे, ए.बी.शिंदे, बाळासाहेब गायकवाड, संगीता गवारे, विठ्ठल गवारे, दत्तात्रय गवारे, गणेश गवारे, सतिष गवारे, सचिन शितोळे, दिनेश पाबळे, सचिन गवारे, सविता गवारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पाबळे यांनी केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या