पिंपरखेड च्या मातेला हवाय उपचारांसाठी मदतीचा हात

पिंपरखेड ,  ता.२६ नोव्हेंबर २०१६ (प्रा.सुभाष शेटे / अाबाजी पोखरकर) : येथील जयश्री सुभाष पोखरकर ही ३५ वर्षीय माता  २ वर्षांपासुन या  अप्लास्टिक अनेमिया आजाराने ग्रस्त असुन डॉक्टरांकडून या आजाराचे निदान झालेले असताना देखिल त्यावर मोठा खर्च येणार असल्याने व उपचारांसाठी जवळ पैसेच नसल्याने या आजारावर उपचार करायचा कसा यामुळे हे कुटुंबच परिस्थितीपुढे हतबल झाले अाहे.

पिंपरखेड येथील हे  अत्यंत गरीब कुटुंब असुन जेमतेम दीड एकर शेती, ३ मुली १ मुलगा अशी  अपत्ये अाहेत. पण पत्नीच आजारी असल्याने मुलांसह पत्नीच्या आजारावर उसने पासने करून तिला जागविण्याचे काम सुभाष पोखरकर हे गेल्या २ वर्षांपासून करत आहेत.हा आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी व त्यावरील उपचारासाठी सुमारे १० ते १२लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने समाजातील गोरगरिबांचे  खरे दुःख जाणणा-या  विविध स्तरातील नागरिकांकडून या मातेच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज ग्रामस्थानी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील सौ जयश्री सुभाष पोखरकर (वय ३५) या  गेल्या २ वर्षांपासून अप्लास्टिक अनेमिया आजाराने ग्रस्त आहेत. पती सुभाष पोखरकर यांना जेमतेम दिड एकर शेती असुन ही नवीन शर्तीची असल्याने पत्नीच्या आजाराने शेती ही पडीकच पडलेली अाहे. तर पत्नीच्या आजारपणाकडे लक्ष देताना  आपला  सायकल दुरुस्तीचा व्यवसाय ही एक वर्षांपासून सुभाष पोखरकर यांना सोडावा लागला अाहे.

पत्नीला सतत रक्त पुरवठा करणे व डॉक्टर उपचारासाठी आतापर्यंत उसने पासने करून सुमारे ५ लाख रुपये खर्च त्यांनी केला अाहे व पत्नीला धैर्याने जागविण्याचे काम ते घरकाम पाहून करत आहेत.

स्वतः स्वयंपाक करणे,मुलांचे शिक्षण  हे पाहून ते पत्नीच्या उपचारासाठी सातत्याने धडपडत आहेत. तज्ञ् डॉक्टरांच्या सल्यानुसार जयश्री यांच्यावर बोनम्यॅरो ट्रान्सप्लांट हा उपचार केल्यास त्या या आजारातून पूर्ण ब-या होण्याची माहिती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी या कुटुंबास दिली असल्याची माहिती सुभाष पोखरकर यांनी दिली आहे .

पोखरकर कुटुंबीयांचे  अत्यंत साधे घर असून, ३ मुली १ मुलगा यांचा सांभाळ व शिक्षण हे पाहून पत्नी जयश्रीला जडलेल्या आजारावर पूर्ण  उपचार करण्यासाठी सुरु असलेला सुभाष पोखरकर यांचा लढा केवळ हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अपुरा पडतोय. गरज आहे समाजातून जयश्रीसारख्या रक्त दोषाच्या गंभीर आजाराने ग्रासलेल्या मातेच्या आजारावर तातडीने उपचार करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची..!
 

जयश्री पोखरकर या मातेच्या उपचारा साठी आर्थिक मदत कारणा-या व्यक्तीनी  खालील सुभाष विठोबा पोखरकर यांच्या खात्यावर मदत पाठविण्याचे आवाहन पिंपरखेड ग्रामस्थानी केले अाहे.
सुभाष विठोबा पोखरकर -महाराष्ट्र बॅंक ,शाखा पिंपरखेड,खाते क्रमांक- 60194405145,  IFSC kode-MAHB0001912
सपंर्क -सुभाष पोखरकर --9096129755
 

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या