शिरुर-हवेली राष्ट्रवादीची शक्ती तालुक्यात वाढणार ?

शिरूर, ता. २९ नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी ) : शिरुर तालुक्यात अनेक पक्षांत सुरु असलेली धुसफुस हळुहळु बाहेर येत असल्याने नाराज कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे जात असुन निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीला च 'अच्छे दिन'येणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु अाहे.

शिरुर तालुका युवक कॉंग्रेस ने गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांनी चांगलेच बाळसे धरु लागली असताना मध्यंतरी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर नाराजांचा गट निर्माण झाला होता.त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षात देखील नाराजांचा गट तयार होत असुन राष्ट्रवादी च्या संपर्कात असल्याचे कळते.शिरुर च्या पुर्व भागातील अनेक कार्यकर्ते देखिल भाजपा सोडण्याच्या मार्गावर अाहेत.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या सोशल मिडियावर थेट पक्षप्रवेशाच्या पोस्ट व्हायरल  होउ लागल्याने या संदर्भात युवक कॉंग्रेस  चे तालुकाध्यक्ष  विजेंद्र गद्रे यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत विचारणा केली असता,माजी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या विशेष उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या धक्कातंञाने तालुक्यातील इतर पक्षातील नेत्यांध्ये चुळबुळ सुरु झाली असुन कहि खुशी तर कहि गम असणा-या कार्यकर्त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लागुन राहिले अाहे.पक्षप्रवेश सोहळ्यास अजितदादा उपस्थित राहणार असल्याने शिरुर तालुक्यातील अागामी काळात होणा-या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकिविषयीची पक्षाची भुमिका व रणणीती देखिल स्पष्ट होणार का? या निमित्ताने निर्माण झालेली संदिग्धता दुर होणार ? असा सवाल केला जात अाहे.

शिरुर तालुक्यातील विविध पक्षांतील नाराजांचा गट राष्ट्रवादीकडे अाकर्षिला जात असल्याने निवडनुकित राष्ट्रवादी ला च अच्छे दिन येणार असुन मातब्बर व विश्वासु कार्यकर्ते पक्ष सोडुन जाउ लागल्याने यात फायदा कोणाचा कोणाला होणार अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगु लागल्या अाहेत.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या