रोटरीच्या वतीने शाळेला 30 हजार रूपयांच्या भेटवस्तू

बुरुंजवाडी ,  ता.३०नोव्हेंबर २०१६ (प्रा.एन.बीे.मुल्ला) : येथील जि.प.प्राथमिक शाळेला शिक्रापूर रोटरी क्लबच्या वतीने ज्ञानगंगा लायब्ररी प्रकल्प या रोटरीच्या उपक्रमांतर्गत एक कपाट व 200 पुस्तके अशी सुमारे 30 हजार रूपये किंमतीच्या भेटवस्तू देण्यात आल्या.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ.मच्छिंद्र गायकवाड बोलत होते.यावेळी शिक्रापूर रोटरीचे संस्थापक अध्यक्ष विरधवल करंजे, सरपंच पुनम टेमगीरे, माजी सरपंच बाळासाहेब टेमगीरे, स्पंदन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश रूके, उपसरपंच विलास नळकांडे, लध्दाराम पटेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र उमाप, राजेंद्र रूके, शितल रूके, जनाबार्इ सरोदे, राजेंद्र नळकांडे, दत्तात्रय टेमगीरे, पांडूरंग टेमगीरे, विनोद टेमगीरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय टेमगीरे, अरूण रूके, वैभव नळकांडे, आण्णासाहेब गैंद, दादासाहेब नळकांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या