विशेष अपंग मुलांसाठीचे कार्य कौतुकास्पद-संदिप जठार

शिरूर, ता. ४ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) : विशेष मतिमंद व अपंगांसाठी शिरुर शहर व परिसरात सुरु असलेले अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन चे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिरुर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी बोलताना व्यक्त केले.

जागतिक अपंग दिनानिमित्त शिरुरमधील विशेष बहुविकलांग,मतिमंद मुलांसाठी काम करणा-या अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन मध्ये विविध कार्यक्रमांचे अायोजन करण्यात अाले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शिरुर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संदीप  जठार हे बोलत होते.

या वेळी पंचायत समिती चे वरिष्ठ सहायक दिलीप धोञे,अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन च्या संस्थापिका राणीताई चोरे,डॉ.सतीश अांधळे, डॉ.मनिषा चोरे, सुनंदा पवार,पञकार नितीन बारवकर, अनिल सोनवणे, शाम बेंडभर, माउली घोडे,संस्थेचे मार्गदर्शक दत्ता केदारी, माहेर संस्थेचे विजय तवर अादी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अाली.

या वेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी संस्थेविषयी माहिती देताना सांगितले कि, समाजात वावरत असताना अापणास ठिकठिकाणी विविध कारणाने अपंगत्व अालेली मुलं अाढळतात.या मध्ये अपंगत्वानुसार या बालकांचा विचार केला असता  मतिमंद, बहुविकलांग, त्याचबरोबर सेरेब्रल पाल्सी, अॉटिझम, डाउनसिंड्रोम अशाने पिडित असलेल्या विशेष मुलांसाठी  काम करणे हे एक मोठे अाव्हानात्मक काम असते. बालकांचे जसजसे वयवय वाढते तशा शारिरिक तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने मुलांचा सांभाळ करणे पालकांना अवघड होउन जाते.समाजाकडुन या बालकांबाबत तिरस्काराची वागणुक मिळत असल्याने पालक देखिल तणावात वावरत असतात.समाजातील अशा विशेष मुलांकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने हि मुले शिक्षणाच्या प्रवाहापासुन दुर फेकली जातात.

समाजातील अशा शिक्षणापासुन वंचित राहणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणुन जगण्यासाठी नवी दिशा देणे महत्त्वाचे असल्याने शिरुर शहरात अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन कार्यरत असुन या संस्थेने शिरुर शहर व परिसरात अशी सुमारे ४० ते ५० मुले केवळ पालकांच्या मानसिकतेमुळे शिक्षणापासुन वंचित राहत असल्याचे अाढळले अाहेत या मुलांच्या शिक्षणासाठी व किमान जीवन जगण्यासाठी संस्थेत विद्यार्थी दाखल केल्यानंतर पालकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी देखिल समुपदेशन  केले गेल्याने अाज सुमारे १६ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणण्यात  यश अाले असुन जगण्याचा हक्क मिळाला अाहे.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याची ओळख करुन घेतली.तसेच सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

या वेळी  संस्थेतील सुमारे १६ विद्यार्थ्यांची बालरोगतज्ञ डॉ.सतीश अांधळे यांनी मोफत अारोग्यतपासणी केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते खाउ वाटप करण्यात अाले.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या