पोलीस स्टेशन महिलांना माहेर वाटलं पाहिजे-नांगरे पाटील

शिरूर, ता. ६ डिसेंबर २०१६ (सतीश केदारी) : प्रत्येक पोलीस स्टेशन हे महिलांना माहेरचं वाटलं पाहिजे.महिलांना जर  असुरक्षित वाटत असेल तर पोलीसांना वर्दी घालण्याचा अधिकार नाही असे मत पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

शिरुर येथे थेट नागरिकांशी सुसंवाद साधत नांगरे पाटील यांनी नागरिकांची मते व सुचना जाणुन घेतल्या.यावेळी उपस्थित शिरुरकर व तालुक्यातील उपस्थित नागरिकांनी प्रत्येकाची मते मांडली.

यावेळी बोलताना नांगरे पाटील म्हणाले कि,सध्या होणा-या निवडणुकांवर बारकाइने लक्ष असुन अाचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु अाहे.निवडनुक काळात गैरकृत्य करणा-यांची गय केली जाणार नाही.त्याचप्रमाणे  दादागिरी,गुंडगिरी खपवुन घेतली जाणार नाही.गुन्हेगारांना जर दंडुक्याचीच भाषा समजत असेल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.शांतता समितीबाबत बोलताना म्हणाले कि, विविध संस्था,शाळा, महाविद्यालय, यांचे प्रतिनीधी एकञ  करत शांतता समित्या स्थापन करण्यात येत  असुन लोकांच्या गरजांनुसार पोलिसिंग करण्यात येत अाहे.पोलीसांच्या घरांबाबत बोलताना ते म्हणाले कि, या बाबत शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असुन मनुष्यबळाच्या तुलनेत ६०% घरांचे नियोजन अाहे.रस्ते  सुरक्षितेबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि, इतर  देशाच्या तुलनेत या देशात दररोज ८ बळी हे रस्ते अपघातात होत अाहेत. हे टाळण्यासाठी महामार्गांवर देखिल गस्त वाढवण्याच्या सुचना देण्यात अाल्या अाहेत.सायबर गुन्हेगारीबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि, सायबर गुन्हेगारांमध्ये वाढ होत  असुन या साठी ६० लाखांची तरतुद करण्यात अाली असुन जिल्हास्तरावर स्वतंञ  सायबर लॅब तयार केली जाणार असुन यासाठीचे सॉफ्टवेअर देखिल विकसित करण्यात अाले अाहे.या सायबर लॅब ला पोलीस ठाण्यांचा दर्जा दिला जाइल असेही ते म्हणाले.

नगसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येनंतर पोलीस स्टेशन वर झालेला हल्ला अादींमुळे पोलीस निरीक्षक गावडे यांच्यावर नाराज होतो असेही बोलताना त्यांनी उपस्थितांना सांगितले.

तत्पुर्वी पोलीस अधिक्षक जय जाधव यांनी पोलीस अधिक्षक जय जाधव यांनी ३६ पोलीस ठाण्यांपैकी सर्वात जास्त पोलीस शिरुर पोलीस स्टेशन ला नियुक्त केले असल्याचे सांगत मनुष्यबळ कमतरता  भासु देत नसल्याचे सांगितले.पोलीस मिञ संकल्पना देखिल सुरु राहणार  असल्याचे डॉ.जाधव यांनी स्पष्ट केले.

या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय  पोलीस अधिकारी वैशाली कडुकर, तहसिलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, शिरुर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

फलेक्स वाल्यांची नावे पाठवा

शिरुर पोलीस स्टेशनला येत  असताना रस्त्यात  वाढदिवसाचे दिसलेले फ्लेक्स यावर थेट निशाना साधत बेकायदेशीर फ्लेक्स,होर्डिंग्ज लावणारांची नावे पाठवा असे अादेश दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या