अंधश्रध्दा व भोंदूगिरीला बळी पडू नका : डॉ.नितीन हांडे

टाकळी भीमा, ता.६ डिसेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : अंधश्रध्दा व भोंदूगिरीला बळी पडू नका असा मौलीक सल्ला अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डॉ.नितीन हांडे यांनी दिला.
 
टाकळी भिमा येथील श्रीराम विद्यालय व प्राथमिक शाळेत लोकाजागॄती फाउंडेशन या संस्थेच्या वतीने अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावर डॉ.हांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रात्यक्षिकाद्वारे भोंदूबाबा कशा पध्दतीने अंधश्रध्दा समाजात पसरवितात हे दाखवून त्यामागील वैज्ञानीक कारणेही डॉ.हांडे यांनी सांगीतली.भोंदूबाबा हे लोकांना भुताटकीची भिती घालून लुबाडतात.भुताटकी हा प्रकार थोतांड आहे.लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणा-या ढोंगीबाबांना थारा देवू नका.आपल्यातील आत्मविश्वास कधीच कमी होवू देवू नका, मग बघा जगातील कोणतेच भूत लागणार नाही असेही यावेळी बोलताना डॉ.हांडे यांनी सांगीतले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हातचलाखी, नजरबंदी, संमोहन आणि केमीकलच्या सहाय्याने लोकांना कसे फसविले जाते याचे प्रयोगही त्यांनी दाखविले.यावेळी अंधश्रध्दा निर्मुलन समिती पुणे येथील प्रणीती देशपांडे, दीपक देशपांडे, लोकजागॄती फौंडेशनचे अध्यक्ष उमेश काळे, मिलींद गायकवाड, जहाँगीर हॉस्पिटल येथील डॉ.गायकवाड, उत्तम वडघुले, अश्विनी जाधव, रूबीना शेख, नितीन वडघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश भुजबळ यांनी केले तर मुख्याध्यापक गायकवाड यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या