शिरूर नगरपरिषदेच्या प्रचाराला वाढु लागला जोर

शिरूर, ता. ८ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) : शिरुर नगरपरिषदेच्या प्रचाराला चांगलाच जोर वाढत चालला असुन पदयाञा,मतदारांच्या गाठीभेटी यावर उमेदवारांकडुन भर दिला जात असल्याचे चिञ दिसत अाहे.

शिरुर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव असल्याने नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली असुन  भाजपच्या उमेदवार वत्सला बाबूराव पाचंगे या "कमळ', बसपच्या शिफा युनूस सय्यद या "हत्ती', बहुजन मुक्ती पार्टीच्या डॉ. वंदेपुष्पा मगन ससाणे या "मेणबत्ती' , शिरूर शहर विकास आघाडीच्या वैशाली दादाभाऊ वाखारे व लोकशाही क्रांती आघाडीच्या सविता अनिल बांडे या अनुक्रमे "कॅमेरा' व "शिटी' या चिन्हावर निवडणुक लढवत अाहे.

शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासह; विविध प्रभागांतील भारतीय जनता पक्षाच्या दहा उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे "कमळ' हे अधिकृत चिन्ह; तर बहुजन समाज पक्षाच्या दहा उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे "हत्ती' हे चिन्ह मिळाले. शहराच्या राजकारणातील प्रमुख असलेल्या शिरूर शहर विकास आघाडीला "कॅमेरा' हे चिन्ह मिळाले आहे. मात्र; आघाडीतील आठ उमेदवारांच्या अर्जासोबत पक्षाचा "एबी फॉर्म' नसल्याने त्यांची अपक्ष म्हणून नोंद झाली असून, त्यांना वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. लोकशाही क्रांती आघाडीला "शिटी' ही चिन्हे मिळाली.

शिरुर शहर विकास अाघाडी चे पॅनेलप्रमुख म्हणुन प्रकाश धारिवाल धुरा सांभाळत अाहेत.तर भाजपाकडुन बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार केले असुन निवडणुकिसाठी व्युहरचना अाखली जात अाहे.अाघाडी साठी टाळी देणा-या भाजपलाही ऐनवेळी पॅनेलची जुळवाजुळव करताना कसरत करावी लागली अाहे.

शिरूर नगरसेवकपदाच्या रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे :
नगरसेवकपदाच्या 21 जागांसाठी रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची नावे ः
प्रभाग क्र. 1 (अ) :ज्योती सीताराम डोळस, डॉ. वैशाली सुहास साखरे, माया शरद गायकवाड, रेश्‍मा दादाभाऊ लोखंडे; 1 (ब) : संदीप रघुनाथ कडेकर, नवनाथ भीमा जाधव, अनिल रामदास चव्हाण, सचिन गुलाब धाडिवाल, चंद्रकांत नामदेव जौंजाळ.
प्रभाग 2 (अ) : एजाज अन्सार बागवान, मुजफ्फर यासीन कुरेशी; 2 (ब) ः शिफा युनूस सय्यद, मनीषा संदीप कडेकर, शमशाद महंमदखान पठाण, अंजली मयूर थोरात.
प्रभाग 3 (अ) :मंगेश दत्तात्रेय खांडरे, जाकीरखान शहीदखान पठाण; 3 (ब) ः वैशाली अमोल कांबळे, मनीषा यशोधन कालेवार.
प्रभाग 4 (अ) : सुवर्णा भगवान माळवे, भारती प्रकाश डंबाळे, पूजा नीलेश जाधव, वैशाली दिगंबर चाबुकस्वार; 4 (ब) ः सुभाष फकीरचंद जैन, केशव संपत लोखंडे, रमेश मारुती कांबळे, अभिजित गणेश पाचर्णे.
प्रभाग 5 (अ) : नितीन मच्छिंद्र पाचर्णे. 5 (ब) : पल्लवी अमोल शहा, सुनीता पोपट कुरंदळे, सुनीता दत्तात्रेय शेलार.
प्रभाग 6 (अ) : ज्योती चंद्रकांत लोखंडे; 6 (ब) : महिबूब जैनुद्दीन सय्यद, तबाजी भानुदास दिवटे, चंद्रकांत नामदेव जौंजाळ, विठ्ठल प्रभू पवार, सागर त्रिंबक नरवडे,
प्रभाग 7 (अ) : ज्योती चंद्रकांत लोखंडे, उज्ज्वला अभय बरमेचा, अश्‍विनी सुदाम पोटावळे; 7 (ब) : संजय तुकाराम बारवकर, मनोहर विश्‍वनाथ शिंदे, दगडू गंगाराम सकट, प्रकाश रसिकलाल धारिवाल.
प्रभाग 8 (अ) : दिनेश देविदास ससाणे, विजय दशरथ जगधने, दगडू गंगाराम सकट, चंद्रकांत विश्‍वनाथ सकट, राजेश दिगंबर जगताप, विनोद प्रकाश भालेराव; 8 (ब) : सुरेखा संतोष शितोळे, माया शरद गायकवाड.
प्रभाग 9 (अ) : संगीता कृष्णा काळे, संगीता महेंद्र मल्लाव; 9 (ब) : सतीश नारायण घोलप, स्वप्नील किशोर माळवे, मितेश प्रदीप गादिया, नीलेश केरू गाडेकर, रवींद्र भानुदास गुळादे, संदीप दिलीप गिरे, पीरमोहंमद हुसेन सय्यद, आबिद महंमद शेख, संजय दत्तात्रेय देशमुख.
प्रभाग 10 (अ) : शैलेश नानासाहेब जाधव, संदीप ज्ञानदेव गायकवाड, कविता यशवंत वाटमारे; 10 (ब) : ज्योती चंद्रकांत लोखंडे, राजश्री कुंडलिक शिंदे, रोहिणी किरण बनकर; 10 (क) : सविता अनिल बांडे, ज्योती सीताराम डोळस, उज्ज्वला वैभव वारे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या