...सायेब, हजार पाचशे तरी काढू द्या !

न्हावरे, ता.८ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) : सायेब गेल्या अाठवडाभरापासुन चकरा मारतोय..रुपया मिळणाय..पेट्रोल ला महाग झालोय.. अाज हजार पाचशे  रुपये तरी काढु द्या अशी अार्त विनवनी करत असल्याचे चिञ जिल्हा बॅंकांच्या शाखांनी सध्या दिसत असुन सर्वसामान्य माञ अक्षरश: मेटाकुटीस अाला असल्याचे दिसत अाहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयानंतर कॅशलेस कडे वाटचाल करत सर्वसामान्य जनतेला कॅशलेस  व्यवहार करण्याचे अावाहन केले अाहे.त्याचबरोबर ग्रामीण भागात जिल्हाबॅंकांवर लादलेल्या निर्णयानंतर अद्यापही मागणीच्या तुलनेत चलनपुरवठा होत नाही.तर दुसरीकडे दैनंदिन व्यवहार रोखीने करणा-या सर्वसामान्य जनतेला कॅशलेस  म्हणजे नेमकं काय याचा उलगडा झाला नसुन मोठ्या गोंधळात असलेली जनता बॅंकेत हेलपाटे घालण्यातच दिवस खर्ची करत अाहे.

बॅंकेचे अधिकारी देखिल मनस्ताप सहन करत असुन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची कशी असा सवाल करु लागली अाहेत.जिल्हा बॅंकांना अद्याप ही सुरळित पतपुरवठा होत नसल्याने सभासद माञ हवालदिल झाला असल्याचे चिञ  दिसु लागले अाहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या