संकेतस्थळाच्या वृत्तानंतर 'त्या' मातेवर होणार उपचार

पिंपरखेड ,  ता.११ डिसेंबर २०१६ (प्रा.सुभाष शेटे / अाबाजी पोखरकर) : येथील परिस्थितीने गांजलेल्या मातेला हवाय उपचारांसाठी हवाय मदतीचा हात अशा अाशयाचे वृत्त संकेतस्थळ व ई-पेपर च्या माध्यमातुन प्रसिद्ध होताच समाजातील संवेदना जपणा-या दात्यांनी मदतीचा हात पुढे केला अाहे.

सविस्तर वृत्त असे कि, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील जयश्री सुभाष पोखरकर ही ३५ वर्षीय माता  २ वर्षांपासून शरीरातील रक्तात झालेल्या  अप्लास्टिक अनेमिया आजाराने ग्रस्त आहे.त्यांची कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असुन जयश्री यांच्यावर बोनम्यॅरो ट्रान्सप्लांट हा उपचार करणे अत्यंत गरजेचे असलेने आमच्या संकेतस्थळ www.shirurtaluka.com व ई पेपर  मधून याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध  करत  पोखरकर कुटुंबियांना जयश्री यांच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

या बातमीची दाखल घेत आळेफाटा ता. जुन्नर येथील रोटरी क्लब चे अध्यक्ष हेमंत वाव्हळ,उपाध्यक्ष विमलेश गांधी,रोटेरियन विशाल भुजबळ,शंकर गडगे,निलेश भंडारी,माजी अध्यक्ष पंकज चंगेडिया,राहुल शेलार आदिंनी पिंपरखेड येथे प्रत्यक्ष भेट देत जयश्री पोखरकर यांना तातडीच्या उपचारासाठी एका लाख रुपयांचा धानादेश रुग्नालयाच्या नावे देण्याचे विमलेश गांधी यांनी सांगितले. तर जयश्री यांना या आजारावरील उपचारासाठी अजून ही काही आर्थिक  मदत मिळवून देण्याचे आश्वासन आळेफाटा रोटरी क्लबच्या  सदस्यांनी पिंपरखेड ग्रामस्थाना दिले.

शिरूर-आंबेगाव शिवसेनेच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर (माउली) घोडे व त्यांच्या सहका-यांनी शिवसेना नेते अरुण गिरे यांच्या वाढदिवशी अतिरिक्त खर्च टाळत जयश्री पोखरकर यांना आर्थिक मदतीचा हात देत समाजापुढे एक स्तुत्य आदर्श ठेवला अाहे.  युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बापूशेठ शिंदे,उद्योजक गोरख बत्ते,पिंपरखेडच्या सरपंच मंदाताई बोंबे व इतर  यां सर्वांनी मिळून सुमारे एक लाख रुपये आर्थिक मदत जयश्री पोखरकर यांना उपचारासाठी दिली आहे.
        
लवकरच जयश्री पोखरकर यांना त्यांच्यावरील बोनम्यॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सुभाष पोखरकर व ग्रामस्थानी सांगितले. 

- See more at: http://www.shirurtaluka.com/index.php?shr=main-page#sthash.uHuPiOsr.dpuf

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या