शिरुरला अायकर विभागाने छापे टाकावेत

शिरूर, ता. ११ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) : शिरुर नगरपालिका निवडणुकित सध्या खर्चात भलताच झगमगाट असुन अायकर विभागाने छापे टाकावेत अशीच परिस्थिती सध्या दिसु लागली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये अाहे.तर या पुर्वी पैशासंदर्भात काहि नागरिकांनी कडक कारवाई करण्याची मागणी देखिल केली अाहे.

शिरुर नगरपालिका निवडणुक ही तालुक्यापासुन ते केंद्रापर्यंत सत्ताधारी असणा-या व दुसरीकडे अतिबड्या व प्रतिष्ठित समजल्या जाणा-या गटांसाठी प्रतिष्ठेची बनली असुन राज्याचे विविध पक्षाचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले अाहेत.या निवडणुकित विविध प्रकारे मतदारांना अापलेसे करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात अाहेत.नुकत्याच झालेल्या कोल्हापुर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बैठकित देखिल शिरुरकरांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.या निवडणुकितील पैशाच्या वाटपा संदर्भात अनेक नागरिकांमध्ये खासगीत चांगल्याच चर्चा रंगत अाहेत.


राञीस खेळ चाले...

नोटबंदी व पोलीसांनी कडक केलेले वातावरण या मुळे पैसे वाटप करण्याची पद्धत देखिल बदलली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या