दृश्यम पाहून केलेला खून रांजणगाव पोलीसांकडुन उघड

रांजणगाव गणपती,ता.१२ डिसेंबर २०१६(प्रतिनीधी) :दृश्यम चिञपट पाहुन केलेला खुन रांजणगाव पोलीसांना उघड करण्यात यश अाले असुन या प्रकरणातील दोन अारोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले अाहे.

याबाबत  रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,येथील पोलीस स्टेशन ला  मिलिंद मारुती आलसपुरे (वय 39 रा.नांदेड) हा दि.4-12-16 रोजी रात्री 11.30 वा. पर्पल ट्रैवेल्स बस मधून नांदेड जात असताना बस कोंढापुरी येथे थांबली असताना तेथून हरवले असल्याची फिर्याद दाखल झाली होती.  
 
या प्रकरणाचा तपास करताना मिलिंद अलसपुरे याने त्याचा चुलत भाऊ कपिल गोपाल आलसपुरे (रा. फुरसुंगी, पुणे)याला भिशी साठी आणि शेयर मार्केट साठी 10 लाख रु. दिले होते. ते पैसे कपील  मिलिंद याला देत नसल्यामुळे मिलिंद हा (ता.4)रोजी फुरुसुंगी पुणे येथे कपील कड़े आला होता. रात्री फुरसुंगी पुणे येथील निर्जन स्थळी कॅनेल चे ठिकाणी कपील याने मिलींद याचे डोक्यात दगड घालून खून केला.अशी माहिती निष्पन्न झाली होती.
 
यानंतर आरोपी कपील याने कट रचुन् मिलिंद याचे नावाने खराड़ी बायपास पुणे येथील पर्पल ट्रैवेल्स ऑफिस मधे नांदेड बस मधे डमी मिलिंद आलसपुरे नावाने तिकीट बुक करुण राम याला बस मधे बसवून कोंढापुरी येथे उतरनेस सांगितले. आणि मयताची बैग आणि मोबाइल बस मधे ठेवले आणि मयत हरवले असल्याचा बनाव केला. नंतर आरोपी कपील याने दीपक बोरा याचे मदतीने (ता.4)रोजी रात्री 11.30 वाजता मिलिंद याचे प्रेत नष्ट कारण्याचे उद्देशाने  फुरसुंगी  केनॉल मधील वहात्या पाण्यात टाकून दिले. 

कपील याने दृश्यम पिक्चर पाहून त्या प्रमाणे कट रचुन मिलिंद हरवला आहे असे सांगत नातेवाईकांची दिशाभूल केली.

या खुन प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक डॉ.जय जाधव,अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले,डी.वाय.एस.पी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे,सहायक पोलीस निरीक्षक सुनील क्षिरसागर,पोलीस कर्मचारी राजु मोमीन,चंद्रकांत काळे,अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, मंगेश थिगळे, घवाटे, शिंदे अादींनी केला.


मिलिंद अलसपुरे याचा फुरसुंगी येथे खून झाल्याने रांजणगाव पोलीस स्टेशन ला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला असुन पुढील तपासासाठी  हडपसर पोलीस स्टेशन ला वर्ग करण्यात अाला अाहे.आरोपी कपील अलसपुरे आणि दीपक बोरा याना ताब्यात दिले आहे.            

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या