जातेगावला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात १७५ प्रकल्प

जातेगाव बुद्रुक, ता.१७ डिसेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : येथील संभाजीराजे विद्यालयात शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनात सुमारे 175 प्रकल्प मांडण्यात आले आहेत.
 
पुणे जिल्हा परीषद व शिरूर पंचायत समीती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार बापूसाहेब पठारे व पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले.यावेळी भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, शिरूर पंचायत समितीचे सभापती सिध्दार्थ कदम, उपसभापती मंगल लंघे, सदाशिव पवार, केशरतार्इ पवार, सुगंधराव उमाप, घोडगंगाचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, जिल्हा परीषद सदस्य नंदकुमार पिंगळे , पंचायत समीती सदस्य भगवान शेळके, दिपालीतार्इ शेळके, आनंदराव हरगुडे , सुभाष उमाप , शंकर जांभळकर, गटशिक्षणाथिकारी अर्जुन मिसाळ , समाधान डोके, राहूल टाकळकर, मधुकर खंडाळे, संभाजी ठुबे, अनिल साकोरे, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला, सोमनाथ भंडारे, प्राचार्य रामदास थिटे,देवादादा उमाप, प्रमोद प-हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात अॅन्टी थेफ्ट सेफ्टी बेल, रेन वॉटर हार्वेस्टर, शुज चार्जर, प्रेशर स्विच, हायड्रॉलीक जेसीबी,  पुरसुचक यंत्र, जलशुध्दीकरण यंत्र, स्मोक डिटेक्टर, सौरउर्जेवर आधारीत प्रकल्प, पवन उर्जा, स्मार्ट सिटी असे नावीण्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात येत आहेत.विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणूम बोलताना माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व कलागुणांना चालना देवून त्यांच्यातील वैज्ञानिक दॄष्टिकोन वाढीस लागण्यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनांची आवश्यकता आहे.

एनसीर्इआरटी भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रनिर्माणासाठी विज्ञान, गणित व तंत्रज्ञान हा मुख्य विषय विज्ञान जगतामध्ये विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक नवकल्पणांना प्रेरणा देणारा असल्याचे प्रास्ताविकात प्राचार्य रामदास थिटे यांनी सांगीतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश बांगर यांनी केले तर संस्थेचे सचिव प्रकाश पवार यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या