शिरूरमध्ये पैसे वाटल्यानंतरच्या वृत्तानंतर एकच खळबळ

शिरूर, ता. 20 डिसेंबर 2016 (प्रतिनिधी)- शिरूर नगरपालिका निवडणूकीवेळी एका पक्षाचा प्रमुख उमेदवार पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाल्याचे वृत्त www.shirurtaluka.com वर प्रसारीत होताच एकच खळबळ उडाली.

'शिरूरमध्ये पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल' या शिर्षकाखाली www.shirurtaluka.comने सोमवारी वृत्त प्रसारीत केले होते. सोशल नेटवर्किंगसह व्हॉट्सऍपवरून वृत्त मोठ्या प्रमाणात दिवसभर शेअर होत होते. मतदारांना पैसे वाटणारा उमेदवार नक्की कोण? याबाबत विचारणा करणारे अनेक दुरध्वनी येत होते. शिवाय, आपण तर या व्हिडिओमध्ये नाही ना? याची धास्ती अनेकांनी घेतली आहे.

संकेतस्थळाने घेतलेल्या मतचाचणीमध्येही अनेकांनी आपले मत नोंदविले असून, निवडणूक ही पैशांभोवती केंद्रीत झाल्याचे म्हटले आहे.
शिरूर नगरपालिका निवडणूक पैशांभोवती केंद्रीत झाली होती, असे आपणास वाटते काय? - See more at: http://www.shirurtaluka.com/index.php?shr=more_news&hid=4093#sthash.w3Frinzs.dpuf

शिरूर तालुक्यात व्हिडिओ व्हायरलीची बातमीमुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, सोशल नेटवर्किंगमुळे कोणतीही घटना लपून राहत नसल्यामुळे यापुढील निवडणूकीत अनेकांना यामधून धडा घ्यावा लागणार आहे.

शिरूरमध्ये पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल
शिरूर, ता. 19 डिसेंबर 2016 (प्रतिनिधी)-
शिरूर नगरपालिका निवडणूकीवेळी एका पक्षाचा प्रमुख उमेदवार पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाला आहे. निवडणूकीदरम्यान मोठ्या प्रमाणात पैस वाटप झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. प्रचारादरम्यान पैसे वाटप होत असल्याचे वृत्त www.shirurtaluka.comने दिले होते.

एका प्रभागात पक्षाचा प्रमुख उमेदवार पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ संपूर्ण शिरूरमध्ये व्हायरल झाला आहे. ज्यांनी पैसे वाटले अशा काही पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शिरूरमध्ये एकूण 19 हजार 568 एवढे मतदान झाले. पैकी 60 टक्के म्हणजे साडेअकरा हजार मतदारांनी पैसे स्वीकारले आहेत. विशेष म्हणजे यातील अनेकांनी दोन्ही बाजूंनी पैसे स्वीकारले आहेत. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चर्चेला उधान आले आहे. पैसे वाटून विजयी झाल्याची तक्रार विरोधक करत आहेत तर मतदारांनी मतदान केल्यामुळे विजयी झाल्याचे उमेदरवार सांगतात. परंतु, निवडणूकीवेळी पैशांचे वाटप झाल्याचे उघड झाले आहे.

निवडणूकीवेळी 200 जणांनी पैसे वाटल्याची आमची माहिती असून, या सर्वांची नावे व पुराव्यानिशी तक्रार शिरूर पोलिसांकडे व निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती एका उमेदवाराने दिली आहे. दोन दिवसांत या पैसे वाटणाऱ्यांची यादी जाहीर करून त्यांच्या घरापुढे घंटानाद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील काही हॉटेल, काही किराणा दुकाने, शहराबाहेरील काही हॉटेल इथूनच मोठ्या प्रमाणात पैसेवाटप झाल्याची चर्चा आहे. पैसे वाटण्याची तयारी मतदानाच्या 15 दिवस आधीच पूर्ण झाली होती. यासाठी 16 हजार पाकिटे हजार-पाचशेच्या नोटांनी भरून तयार करून ठेवली होती, असेही समजते. थोडक्यात, शिरूर नगरपालिका निवडणूक पैशाभोवतीच केंद्रीत झाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या