'त्या' तरुणांनी घालुन दिला समाजाला अादर्श

पिंपरखेड,ता.२१ डिसेंबर २०१६(अकबर पिंजारी) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील जयश्री सुभाष पोखरकर ही ३५ वर्षीय माता  २ वर्षांपासून शरीरातील रक्तात झालेल्या  अप्लास्टिक अनेमिया आजाराने ग्रस्त आहे. त्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असुन उपचारांसाठी मदतीची अत्यंत अावश्यकता असल्याचे समजताच परिसरातील तरुणांनी वाढदिवसाचा खर्च टाळुन त्या मातेच्या उपचारासाठी पुढे येत मदत देउ केल्याने समाजाला नवा अादर्श घालुन दिला अाहे.

वडनेर येथील साईक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक नवनाथ निचित यांच्या वाढदिवसा निमित्त इतर खर्च टाळून पिंपरखेड येथील जयश्री पोखरकर यांना साईक्रांती प्रतिष्ठाण मित्र परिवार तसेच नवनाथ निचित, विक्रम निचित, बाबाजी निचित यांच्या तर्फे 10001 रु मदत पिंपरखेड येथे महिलेच्या घरी जावून मदत देउ केली अाहे.

यावेळी युवा सेनेचे शिरुर तालुका अध्यक्ष माऊलीशेठ घोडे, साईक्रांती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विक्रम निचित, संस्थापक नवनाथ निचित, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे, बाबाजी निचित, अर्जुन निचित, विकास कापसे, आकाश घोगरे,पत्रकार आबाजी पोखरकर, दत्ता चौधरी, पोखरकर व त्यांचे सर्व कुंटुबिय उपस्थित होते.

या पुर्वी शिरूर-आंबेगाव शिवसेनेच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर (माउली) घोडे व त्यांच्या सहका-यांनी शिवसेना नेते अरुण गिरे यांच्या वाढदिवशी अतिरिक्त खर्च टाळत जयश्री पोखरकर यांना आर्थिक मदत देउ केली अाहे.तर  युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बापूशेठ शिंदे,उद्योजक गोरख बत्ते,पिंपरखेडच्या सरपंच मंदाताई बोंबे व इतर  यां सर्वांनी मिळून सुमारे एक लाख रुपये आर्थिक मदत जयश्री पोखरकर यांना उपचारासाठी दिली आहे. तर आळेफाटा ता. जुन्नर येथील रोटरी क्लब चे अध्यक्ष हेमंत वाव्हळ,उपाध्यक्ष विमलेश गांधी,रोटेरियन विशाल भुजबळ,शंकर गडगे,निलेश भंडारी,माजी अध्यक्ष पंकज चंगेडिया,राहुल शेलार आदिंनी पिंपरखेड येथे प्रत्यक्ष भेट देत जयश्री पोखरकर यांना तातडीच्या उपचारासाठी एका लाख रुपयांचा धानादेश रुग्नालयाच्या नावे देण्याचे विमलेश गांधी यांनी मदतीचे अाश्वासन दिले होते.

समाजातील तरुणांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने या तरुणांनी समाजापुढे नवा अादर्श घालुन दिल्याने परिसरात या तरुणांचे कौतुक होत  अाहे.या कुटुंबाला मदत करणे अत्यंत गरजेचे असल्याने आमच्या संकेतस्थळ www.shirurtaluka.com व ई पेपर  मधून याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध  करत  पोखरकर कुटुंबियांना जयश्री यांच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या