लोकनृत्य स्पर्धेत कान्हुर मेसाईच्या विद्याधाम चे यश

कान्हुर मेसाई, ता.२४ डिसेंबर २०१६ (अकबर पिंजारी) : जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर येथे आयोजित केलेल्या शरद मल्हार नृत्य महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेत कान्हुर मेसाई येथील विद्याधाम हायस्कुलने मोठया गटात द्वितीय क्रमांक मिळविल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र माने यांनी दिली. 

बालाजी इंग्लिश मिडिअम स्कुल, शिरुर येथे या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयातील सांस्कृतिक समितीचे मनोज धुमाळ, विनोद शिंदे, दिपक मोरे, प्रकाश चव्हाण,बेबीनंदा केंदळे, जयश्री गायकवाड, सुनिता खर्डे, तृप्ती डावखर, अलका मापारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पुंडे,सचिव गंगाधर पुंडे, पर्यवेक्षक दत्तात्रय खोडदे,मुस्लिम ओबीसी संघटना शिरुर तालुकाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या अाहेत.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या