शिरूर तालुक्यात केवळ प्रसिद्धीसाठी राजकीय उड्या?

शिरूर, ता. 24 डिसेंबर 2016 (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यातील काही नेते केवळ प्रसिद्धीसाठी राजकीय उड्या मारत असल्याची जोरदार चर्चा शिरूर तालुक्यात अनुभवायाला मिळत आहे. शिरूर नगरपालिकेची नुकतीच निवडणूक पार पडली असून, यापुढे पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर व केवळ प्रसिद्धीसाठी राजकीय उड्या मारल्या जात असल्याच्या चर्चा ठिकठिकाणी जोरात रंगू लागल्या आहेत.

शिरूर नगरपालिकेच्या निवडणूपूर्वी काही नेत्यांनी एका पक्षात प्रवेश केला. विविध दैनिकांमध्ये बातम्या छापून आल्या, फ्लेक्स लावले गेले अन् प्रसिद्धी मिळवली. शिरूरमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या सभेवेळी सभेवेळी अनेकांनी काही दिवसातच 'त्या जाहीर' प्रवेश केला. या प्रवेशावेळी छायाचित्रे काढण्यासाठी नेत्यांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र अनेकांनी पाहिले. या पक्षात प्रवेश केलेले नेते यापुढेही पक्षाशी एकनिष्ठ राहणार का? हा खरा प्रश्न आहे, असे एका कार्यकर्त्याने सांगितले. एखाद्या पक्षात उडी मारल्यानंतर डाळ शिजली जाते का याचा अंदाज घेतला जातो. डाळ शिजली तर ठिक नाहीतर काही दिवसातच पुन्हा उडी. उड्या मारणाऱया नेत्यांमुळे पक्षाशी एकनिष्ट असणाऱया व वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱयांवर एकप्रकारचा अन्याय होत आहे, असेही एका कार्यकर्त्याने संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.

प्रसार माध्यमांमधून मागे पडत असल्याचे लक्षात येताच अनेकजण वेगवेगळे फंडे निवडतात व काहीतरी योजना राबवितात. बातम्या छापून येतात प्रसिद्धी मिळते अन् पुढे काय होते, हे त्यांनाही समजेणासे होते. खरंच, सामाजिक कामे करायची असतील तर सतत राजकीय उड्या कशासाठी मारतात हा प्रश्न उपस्थित होतो. शिरूर तालुक्यातील विविध व्हॉट्सऍप ग्रुपवर राजकीय नेत्यांच्या उड्यांबाबत जोरदार चर्चा रंगलेली पहायला मिळत असून त्यांची खिल्लीही उडविली जात आहे.

शिरूर तालुक्यातील अनेकजण स्वतःला नेते समजणारे 'खोबरे तिकडे उदोउदो' प्रमाणे विविध पक्षांमध्ये उड्या मारताना दिसतात. राजकीय कारकिर्दीमध्ये अनेकांनी आजपर्यंत एकही पक्ष सोडलेला नाही. मग या नेत्यांच्या उड्या नेमक्या कशासाठी? असा सवाल अनेकजण उपस्थित करतात. शिरूरमधील काही नेते तर पत्रकारांना धरून राहतात ते केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी, असे एकाने व्हॉट्सऍप ग्रुपवर म्हटले आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांच्या खिल्लीबाबत ठिकठिकाणी चर्चा सुरू आहेत. परंतु, या चर्चा तेवढ्यापुरत्याच मर्यादीत राहतात. सोशल नेटवर्किंग व www.shirurtaluka.comमुळे संबंधीत बातमी वाचकांसमोर येणार आहेत. यापुर्वी अशा बातम्या कोठेच वाचायला मिळत नसल्याने नेत्यांनाही आपल्या पाठीमागे काय बोलले जाते, हे कळेनासे होत होते. परंतु, सोशल नेटवर्किंगमुळे व्यासपीठ मिळाले आहे. शिरूर तालुक्यात खरोखरचं अशी परिस्थती आहे का? तुम्हाला याबाबत नक्की काय वाटते, आपल्या प्रतिक्रिया बातमीच्या खाली अथवा shirurtaluka@gmail.comच्या माध्यमातून जरूर लिहा. निवडक प्रतिक्रियांना संकेतस्थळाच्या ई-पेपरच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या