प्रमुख नेत्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांची पाठ

न्हावरे, ता.३० डिसेंबर २०१६ (सतीश केदारी): पुणे जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्धाटन समारंभ व भाषणाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरविल्याने 'त्या' कार्यक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगु लागली अाहे.

अाचारसंहितेचे निर्बंध नसल्याने सध्या सर्वच पक्षांकडुन गावोगावी उद्धाटनांचा धडाका मोठ्या प्रमाणावर सुरु अाहे. सध्या उद्घाटनाचा घाट घालुन शेवटी शेवटी तरी निधी पदरात पडावा यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडुन कसोशी ने प्रयत्न केले जात अाहे.

नुकतेच न्हावरे या ठिकाणी विविध विकासकामांच्या उद्धाटनासाठी जिल्हापरिषदेच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात अाले होते. या कार्यक्रमाला तुरळक गर्दी व बोटावर मोजता इतकेच ग्रामस्थ उपस्थित होते. व्यासपीठावर बसायला जागा नाही अन् ऐकायला श्रोते नाहीत अशी कार्यक्रमाची स्थिती झाली होती. यामुळे कार्यक्रमाचा रंगरुप पाहुन नेत्यांनी भाषणे अावरती घेतली, याबाबतची चर्चा कार्यक्रमानंतर नागरिकांमध्ये रंगली होती.

दरम्यान, अशीच परिस्थिती इतर उद्घाटनांच्या बाबतीत दिसुन येत आहे. सर्वसामान्य माञ अशा कार्यक्रमांपासुन दुरच राहणे पसंत करत अाहेत.

शिरुरकरांनी जरा सुधरावं

अाम्ही हायवेच्या कडेला असल्याने जरा बरं अाहे.पण शिरुरकर माञ कधी सुधारणार असा प्रश्न उपस्थित करत दुस-यांच्या गावात येउन डोकावु नये असा थेट अप्रत्यक्ष निशाना साधत अापण कोणावरही टिका करायला येत नाही असेही 'त्यांनी' या वेळी उपस्थितांना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या