सरत्या वर्षात शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत ४५ बलात्कार

शिरुर,ता.३१ डिसेंबर २०१६ (सतीश केदारी) : सरत्या वर्षाला निरोप देताना संकेतस्थळाने केलेल्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर  येत असुन शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत ४५ महिलांवर  अत्याचाराच्या घटना घडल्या असुन ग्रामीण भागातील महिला देखिल सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत अाहे.

शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी,न्हावरा, मांडवगण फराटा अादी दुरक्षेञ अाहेत.इतर पोलीस ठाण्यांपेक्षा तालुकयाचे ठिकाण शिरुर असल्याने शिरुर पोलीस स्टेशनवर कामाचा ताण जास्त असतो.संकेतस्थळाला मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षी ३९ महिला अत्याचाराच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या तर या वर्षी माञ तीच संख्या ४५ वर गेली अाहे.या अाकडेवारीवरुन अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.

ब-याचदा अत्याचार झाल्यानंतर पिडित महिला तक्रार द्यायला धजावत नसल्याने व शेवटपर्यंत ठाम राहत नसल्याने त्याचप्रमाणे दबाव अाल्याने तक्रार दाखल केली जात नाही.परंतु अाता अत्याचार घडल्यानंतर तक्रार दाखल करण्याचे प्रमाण देखिल वाढले अाहे असेच म्हणावे लागेल.

पोलीस अदखलपाञ गुन्ह्यांमध्ये  देखिल गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होत  असुन सामान्य नागरिक देखिल तक्रारी द्यायला पुढे येत अाहेत.शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतुकीच्या सर्वाधिक गुन्हयांची नोंद झाली असुन पोलीस स्टेशन च्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक कारवाया वाहनचालकांवर केलेल्या असुन दंड देखिल मोठ्या प्रमाणावर वसुल केलेला अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या