जवानाची घरासाठी फरफट; याचना करण्याची वेळ

मांडवगण फराटा, ता.३१ डिसेंबर २०१६ (संपत कारकूड): सिमेवर देशासाठी लढत असताना इकडे माञ अतिक्रमणामध्ये घर पाडल्याने अाता जायचं कुठं  असा सवाल करत अक्षरश: प्रशासनापुढे माथे टेकवण्याची वेळ अाली  अाहे.

मांडवगण फराटा येथे नुकतेच अतिक्रमणांवर कारवाई करण्यात अाली.या कारवाई मध्ये गोरगरिबांच्या पाला झोपड्यांसह घरे पाडण्यात अाली.या मध्ये लान्सनायक बाळु चौघुले यांचे देखिल  घर पाडण्यात  अाले अाहे.

लान्सनायक बाळु चौघुले हे राजस्थान मधील जैसलमेर येथे सध्या कर्तव्य बजावत असुन अाई वडील फारसे शिक्षित नसुन वार्धक्याकडे झुकलेले ााहेत.ते मांडवण येथे कायमचे वास्तव्यास असुन माजी सरपंच लतिका वराळे-जगताप यांच्या काळात त्यांना घरासाठी ग्रामपंचायत ठराव देखिल करण्यात अाला होता.परंतु या वेळी माञ जवान देशासाठी  सिमेवर लढत असताना प्रशासनाने घरावरच हातोडा फिरवला अाहे.त्यामुळे चौघुले यांना कामावरुनच अाहे त्या स्थितीत गावी यावे लागले अाहे.

याबाबत चौघुले यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले कि, प्रसासनाने नैतिकता दाखवुन किमान मला नको परंतु माझ्या अाइ वडिलांसाठी कायमस्वरुपी राहण्याची व्यवस्था करावी.पै-पै जमा करुन घरासाठी मी झटत होतो.अनेक स्वप्न उराशी बाळगुन होतो.परंतु ग्रामपंचायत ने माञ कसाया प्रमाणे कारवाई करुन बेघर केले अाहे.अाता माझ्याकडे पैसे राहिलेच नाही.

याबाबत संकेतस्थळाने गटविकास अधिकारी संदिप जठार यांना विचारले असता,दोन दिवसांत तातडिचा अहवाल मागितला असुन त्यात दोषी अाढल्यास पुढील कारवाई करणार अाहे असे सांगुन शक्य तेवढी मदत करणार असल्याचे सांगितले. तर तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी देखिल जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या