मोदीशेठ पैसे काढायचे तरी कसे ?

तळेगाव ढमढेरे,ता.२ जानेवारी २०१६ (जालिंदर अादक) : एटीएममधून नवीन वर्षापासून साडेचार हजार रुपये मिळण्याची घोषणा करण्यात अाली परंतु अनेक ठिकाणी एटिएम बंदच असुन काहि ठिकाणी पुरेसे पैसेच नसल्याचे चिञ दिसत असुन पैसे काढायचे तरी कसे असा सवाल सर्वसामान्य करु लागले अाहेत.

नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर एटीएममधून केवळ दोन हजार रुपये नागरिकांना काढता येत होते. त्यामुळे नागरिकांना पैशांसाठी वारंवार रांगा लावाव्या लागल्या. पन्नास दिवस नागरिकांनी प्रामाणिकपणे मोठ्या प्रमाणात बँका आणि एटीएमसमोर रांगा लावून पैसे काढले.पन्नास दिवसानंतर या रांगा कमी होण्याची अपेक्षा होती; मात्र अद्याप हि बंका व एटिएम समोरील रांगा काहि कमी झाल्या नाहीत आणि नागरिकांना पन्नास दिवसानंतर हि रांगेतच उभे राहावे लागत अाहे.

नोटा बदलून देण्याची मुदत (ता.24) नोव्हेंबरला संपली. त्यानंतर नागरिकांना केवळ बँकांमध्ये जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा भरता आल्या. चलनातून बंद झालेल्या नोटा शुक्रवार (दि.30)पर्यंत भरण्याची मुदत होती. केंद्र सरकारकडून पन्नास दिवसांमध्ये परिस्थिती सुधारण्याचे आश्‍वासन दिले होते. बँकांबरोबरच सुरुवातीचे काही दिवस पोस्टातून देखील पैसे बदलून देण्याची सुविधा होती; मात्र नंतर पोस्टातूनही पैसे बदलून देणे बंद केले, त्यामुळे बंँकांवर मोठा ताण पडला.जिल्हा बॅंकांवर देखिल निर्बंध लादले गेल्याने सर्वसामान्यांचा पैसा माञ गुंतुन राहिला.नागरिकांची पैशांसाठीची भटकंती पन्नास दिवसांनंतरही थांबलेली नाही. रविवारी  नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक एटीएम  बंद होती. त्यामुळे नागरिकांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी पैशांसाठी भटकंती करावी लागली आहे.

जिल्हा बॅंकांमध्ये अद्याप पुरेसेपैसे येत नसल्याने नागरिकांना अारटीजीएस चा अाधार घ्यावा लागत अाहे.यात हि अनेकांना हा व्यवहार करताना मनस्तापच सहन करावा लागत अाहे.अनेक ठिकाणी रोखीने व्यवहार चालत असल्याने त्यांना रक्कम द्यावी कोठुन असा सवाल नागरिक करु लागले अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या